कोरोनाच्या आकड्याची कमान वाढतीच

कोरोनाच्या आकड्याची कमान वाढतीच 

वेब टीम नगर : जिल्ह्यात कोरोनाच्या आकड्यांची कमान दिवसेंदिवस वाढतेच राहिली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने निर्बंध लागू केले आहेत. नव्हे दिवसेंदिवस हे निर्बंध कडकच होत आहेत. मात्र कोरोना बाधितांचे आकडे कमी होण्याचे नाव घेत नाहीत.आजही कोरोना बाधितांच्या संख्येने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. आज जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३५९२ इतकी झाली आहे. 

कोरोना बाधितांची संख्या वाढतच असून त्यात अहमदनगर शहरात - ८४८, तर राहता - ३१२,संगमनेर - २१७, श्रीरामपूर - ९८ , नेवासे -२०६, नगर तालुका -३४७,पाथर्डी-१९५,अकोले - १८९,कोपरगाव - १४४, कर्जत - १५९, पारनेर - १२४, राहुरी - २०२, भिंगार शहर - ७७ , शेवगाव - १५३,जामखेड - ८०, श्रीगोंदे - ९९, मिलिट्री हॉस्पिटल - १२, इतर जिल्ह्यातील - १२७, इतर राज्यातील - ०२ अशी आजची आकडेवारी आहे.

कालच पालकमंत्र्यांनी कोरोनाची आकडेवारी वाढतीच राहिली तर निर्बंध आणखीन करावे लागतील असे सांगितले होते. त्यानुसार आज औषधाची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने ११ वाजताच बंद करण्यात आली. याशिवाय शहरात अजूनही रेमडेसीवीर च्या इंजेकशन्सचा व ऑक्सिजनचाहि तुटवडा असल्याचे दिसत आहे. 

Post a Comment

0 Comments