कोविडशी लढतांना

 कोविडशी लढतांना 

विषा बद्दल असे सांगितले जाते की विष जेव्हा प्रथम उत्पन्न झाले तेव्हा त्याला पाहून सर्व जग विषण्ण झाले. त्यामुळे त्याला विष हे नाव पडले कोविड-१९  बाबत असेच झाले आहे कोविड -१९  मुळे सर्व जग सर्व बाजूने विषण्ण झाले आहे. आशा या विषवत असणाऱ्या कोविडच्या बाबतीत भारतात मात्र जगातील

प्रगत राष्ट्रांच्या मानाने मृत्युदर सर्वात कमी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे याचे श्रेय आपल्या देशातील परंपरागत जीवनशैली आणि वैद्यकशास्त्र म्हणजे आयुर्वेद याला जाते. 

या कोविड  बाबत त्याच्या पुन्हा आलेल्या,  लाटा वगैरे पाहून लसीकारणांची आवश्यकता लक्षात घेऊन जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे.  एकंदर आपल्याला कोविड सोबत जगावे लागणार आहे हे आता जवळपास निश्चित होत आहे . अशावेळी कोविड, किंबहुना  कोविडच कशाला भविष्यात आणखी वेगळे आजार आले तर त्याबद्दल आयुर्वेद काय सांगतो ते आपण पाहूया. 

बर्‍याचजणांना प्रश्न पडतो की आयुर्वेद इतका जुना , कोविड हा नवीन हजार मग कोविड विषयी आयुर्वेद काय सांगणार? पण कोविड जरी नवीन असला तरी तो किंवा कोणतेही आजार ज्या शरीराच्या आधाराने व्यक्त होतात ते शरीर, शरीरघटक तेच आहेत.आयुर्वेद शरीर घटकांमध्ये विविध कारणांनी होणारी विकृती त्या विकृतीच्या मूळ कारणांचे वर्णन करतो या विकृती त्याची मूळ कारणे याची तत्वे शाश्वत आहेत म्हणूनच आयुर्वेद सांगतो की एखाद्या आजाराला नाव देता आले नाही तरी हरकत नाही आजारांना नाव देता येतेच असे नाही, पण त्याची चिकित्सा करता येते. 

कोविड सारख्या संक्रमक आजारांबाबत आयुर्वेद सांगतो की  संपर्काने, स्पर्शाने, श्वासाने एकत्र भोजनाने , एकत्र झोपल्याने अनेक आजार जसे त्वचारोग, ताप, डोळे येणे हे संसर्गजन्य आजार एका कडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत जातात. त्यामुळे आणि या अशा संसर्गजन्य रोगांची बाबत आपण स्वतःचे आरोग्य बलवान करणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. या दृष्टीने काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.  साधारणतः  जीवनशैली महत्त्वाची ठरते आपले शरीर ही निसर्गाची देणगी आहे.  म्हणूनच आपली जीवनशैली जितकी नैसर्गिक असेल तेवढे चांगले यासाठी 

(१).लवकर झोपणे - लवकर उठणे - निरोगी व्यक्तींनी आपले स्वास्थ्य टिकून ठेवण्यासाठी लवकर म्हणजे सकाळी सहा पूर्वी उठणे आणि रात्री अकराच्या आत  झोपणे आवश्यक आहे.दुपारची झोपही सामान्यपणे अनावश्यक आहे. 

(२)  अभ्यंग , नस्य - सर्व शरीराला आपल्या हाताने तिळाचे , खोबर्‍याचे तेल लावणे हे अनेक रोगांना रोखू शकते याच्या जोडीला नाकपुडीला आंघोळीनंतर आतून तिळाचे तेल किंवा गाईचे तूप बोटाने लावणे, अणू तेल नावाचे औषधी तेलही  उत्तम आहे. कोविड रोखण्यात हे नस्य महत्वाचे कार्य करते जलनेतीचाही  उपयोग होतो. 

(३) व्यायाम -  सकाळी उपाशी पोटी मल विसर्जनानंतर केलेला व्यायाम बल वाढवण्यासाठी महत्त्वाचा आहे. विशेषतः सूर्यनमस्कार आणि योगासने.पण  याबाबत एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे कोणताही व्यायाम हा योग्य प्रमाणात केला तरच बलवर्धक होतो, अन्यथा अति व्यायाम हा बल हानीच करतो. 

(४)  भोजन -  जेवण हा आपले बल वाढविणारा आणि कमी देखील करणारा घटक आहे सकाळी १० ते १२ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळात जेवण करावे. भूक लागल्यावर न जेवणे आणि भूक लागली नसतांना जेवणे या दोन्ही गोष्टी आजारांना आमंत्रण देतात.  आवडते पदार्थ पोटभर खाणे, बाकी पदार्थ कमी खाणे हेही घातकच.जेवणाच्या बाबतीत आवडी पेक्षा गरजे ला प्राधान्य द्यावे.

(५) मनोधारणा -  मला काही होत नाही असा निष्काळजीपणा आणि मला काही झाले तर नाही ना? मला काही होणार तर नाही ना ? अशी भीती , चिंता या दोन्ही गोष्टी सारख्याच त्रासदायक आहेत.म्हणून निष्काळजीपणा किंवा भीती, चिंता न करता योग्य ती काळजी घ्यावी.जर कधी कोविड  झालाच तर सकारात्मक विचार ठेवून मी लवकरच बरा होणार आहे, असा ठाम विचार मनात ठेवावा.सकारात्मक विचाराने शरीरात आवश्यक ती शक्ती निर्माण होऊन लवकर बरे होता येते हे सिद्ध झाले आहे. 

 (६) बलवर्धक औषधे -  कोविड साठी अनेक जण अनेक औषधे घेत आहेत.एक लक्षात घेतले पाहिजे की , "अमुक औषध घेतल्यावर कोविड होणार नाही"  असे कोणतेही औषध नाही परंतु काही औषधे घेतल्यास कोविड झाला तरी फरशी लक्षणे न होता,गंभीर अवस्था उत्पन्न न होता,त्यातून बरे होता  येऊ शकते.  त्यादृष्टीने आवळा ,गुळवेल, तुळस अशी औषधे,चवनप्राश सारखे कल्प उपयोगी ठरतात एवढे करूनही कोविड सदृश लक्षणे आलीच तर त्वरेने चिकित्सा करणे आवश्यक आहे, वर सांगितलेले सर्व उपाय साकल्याने करून आपण सामान्यतः निरोगी आयुष्य जगू शकतो. सुंठ, मिरे, दालचिनी यासारखी औषधे उष्ण असल्यामुळे त्यांचा वापर जपून करायला हवा, त्याचबरोबर कोविड विषयी युट्युब , व्हाटसऍप इत्यादीवर सतत मिळत असलेले ज्ञान न घेता आपण आपले मनोधैर्य चांगले ठेवले तर या आणि अशा आजारांचे दुष्परिणाम टाळू शकतो.  आयुर्वेदाने सांगितलेले पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी देखील बलवर्धक करण्याचे उत्तम कार्य करते. 

 वैद्य मंदार केशव भणगे -एम् . डी (पंचकर्म)

Post a Comment

0 Comments