... तर लॉकडाऊन आणखीन कडक करावा लागेल : हसन मुश्रीफ

 ... तर लॉकडाऊन आणखीन कडक करावा लागेल : हसन मुश्रीफ  

वेब टीम नगर:  नगर जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुडवडा आहे. मात्र सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात समप्रमाणात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज जिल्ह्यातील आढावा बैठक घेतली. साईबाबा संस्थानच्या दोन्ही हॉस्पिटलची पाहणी करत त्यांनी जिल्हा प्रशासनाला काही सूचना केल्या. अगोदर सुरु असलेल्या संस्थानच्या कोविड रुग्णालयात बेड संख्या वाढवण्यासोबत संस्थानच्या साईबाबा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 150 बेडची व्यवस्था तर साईनाथ रुग्णालयात 300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर, आयसीयू अशा सुविधा याठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. इतर रुग्णांची परवड होऊ नये यासाठी 100 बेड हे डायलेसिस, हृदयरोग तसेच इतर अतिमहत्वाच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.

हसन मुश्रीफ यांचे अगोदर खासदार सुजय विखे, राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी प्रशासनाला सल्ला देत या रुग्णालयात कोविड बेडची व्यवस्था करण्याच नियोजन केलं होत. हलगर्जीपणा करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचं मुश्रीफ यांनी सांगताना लॉकडाऊन आणखी कठोर करण्याचे संकेत दिले आहेत. 

नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलीय. मात्र भाजीपाला, फळे, दूध आणि किराणा खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाहीत. पोलिसांना संयम ठेवण्यास सांगितल्याने कठोर कारवाई करता येत नाही. त्यामुळे यावर अत्यावश्यक सेवेतील काही गोष्टींवर निर्बंध आणण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

अहमदनगर जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुडवडा आहे. मात्र सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात समप्रमाणात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. 


Post a Comment

0 Comments