कोविड रुग्णांना दररोज ५०० ते६०० ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करुन देणार

कोविड रुग्णांना दररोज ५०० ते६०० ऑक्सीजन  सिलेंडर उपलब्ध करुन देणार

 विलास लोढा : अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेस प्रा.लि.व युवक काँग्रेसचा उपक्रम

वेब टीम नगर : सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून, त्यामुळे अनेकजण बाधित होत आहेत. या रुग्णांवर रेमडिसिव्हर इंजेक्शन आणि ऑक्सिजन या दोन गोष्टीची उपचारात महत्वपूर्ण भुमिका तयार झाली आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार व संबंधित कंपन्या आपआपल्या परिने प्रयत्न करत आहेत. औषध कंपनीची संख्या मर्यादित असली तरी ऑक्सिजन सिलेंडर हे स्थानिक पातळीवर उपलब्ध होऊ शकतात. औद्योगिक क्षेत्राबरोबरच हॉस्पिटलसाठी या ऑक्सिजन सिलेंडरचा उपयोग होत असतो. अहमदनगरमध्येही एमआयडीसी येथील अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेस प्रा.लि. या कंपनीच्यावतीने ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती केली जात आहे. 

सध्याच्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ऑक्सिजनची अधिक आवश्यकता भासत आहे. या गोष्टीचा विचार करुन अहमदनगर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पै. मोसिम शेख व कंपनीचे विलास लोढा यांनी पुढाकार घेत दररोज ५०० ते ६०० सिलेंडर कोरोना बाधित रुग्ण असलेल्या हॉस्पिटलसाठी उपलब्ध करुन देणार असल्याचा मानस केला आहे. जेणे करुन रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल. प्रशासनाच्या सहकार्याने आवश्यक असणार्‍या रुग्णांलयासाठी ती उपलब्ध करुन दिली जातील. त्याच बरोबर कंपनीच्यावतीने आणखी जास्तीत जास्त ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती कशी करता येईल, या दृष्टीनेही प्रयत्न सुरु असल्याची माहिती अहमदनगर इंडस्ट्रियल गॅसेस प्रा.लि. चे संचालक विलास लोढा यांनी दिली.

याप्रसंगी पै.मोसिम शेख म्हणाले, कंपनीच्यावतीने औद्योगिक वापराबरोबर हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती करण्यात येत आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. या गोष्टीचा विचार करुन आम्ही हॉस्पिटला आवश्यक असणार्‍या सिलेंडरला प्राधान्य देऊन ते उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. त्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आली असून, त्या माध्यमातून दररोज ५०० ते ६०० सिलेंडर हॉस्पिटलला उपलब्ध करुन देणार आहेत. हॉस्पिटल बरोबरच औद्योगिक चक्रही सुरु राहिले पाहिजे, आवश्यकतेनुसार कंपन्यांनाही गॅस सिलेंडर उपलब्ध करु देत आहोत. परंतु सध्या नागरिकांचे प्राण महत्वाचे असून, त्यास प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.(फोटो-गॅस )

Post a Comment

0 Comments