ऑक्सिजन वाहतुकीला केंद्राची परवानगी

ऑक्सिजन वाहतुकीला केंद्राची परवानगी 


वेब टीम नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य, डीपीआयआयटी, स्टील, रोड ट्रान्सपोर्ट मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत देशातील ऑक्सिजन पुरवठा आणि ते पुरवण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या. वाढती मागणी पाहता ऑक्सिजन निर्मिती करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर स्टील प्लांटना देण्यात येण्याऱ्या अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा आरोग्य वापरासाठी करण्यास सांगितलं आहे.

देशात ऑक्सिजन पुरवठा करण्याऱ्या टँकर्सना सूट देण्यासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. कोणतीही अडवणूक न करता देशात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सांगितलं आहे. ड्रायव्हरर्सनंही दोन शिफ्टमध्ये काम करत योग्य ठिकाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सिलिंडर भरण्याऱ्या कंपन्यांनी २४ तास काम करण्याची तयारी ठेवावी अशी विनंतीही केली आहे. तसेच नायट्रोजन आणि ऑर्गन  पुरवठा करण्याऱ्या टँकर्सनाही ऑक्सिजन पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments