कोरोना लसीच्या निर्मितीची हॉफकिन्स ला परवानगी

 कोरोना लसीच्या निर्मितीची हॉफकिन्स ला परवानगी 

वेब टीम मुंबईः  मुंबई येथील ' हॉफकिन्स इन्स्टिट्यूट'ला 'भारत बायोटेक' कडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने करोनाप्रतिबंधक 'कोव्हॅक्सिन' लस बनविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसं ट्वीटच त्यांनी केलं आहे.

राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या व लसीचा तुटवडा याबाबत काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहलं होतं. त्यात प्रामुख्यानं पाच मागण्या केल्या होत्या. तसंच, लशींचा पुरवठा वेळेत होण्यासाठी हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक आदी अन्य संस्थांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. अखेर केंद्र सरकारने याबाबत काल निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राज ठाकरेंनी पंतप्रधानांना उद्देशुन एक ट्वीट केलं आहे. तसंच, त्यांनी एक केंद्र सरकारला एक आवाहनही केलं आहे.

१०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हॉफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत. याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तर, केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण या संकटावर सहज मात करु हे नक्की, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुंबई येथील ' हॉफकिन्स इन्स्टिट्यूट'ला 'भारत बायोटेक'कडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने करोनाप्रतिबंधक 'कोव्हॅक्सिन' लस बनविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी गुरुवारी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना याबाबत पत्र पाठवले आहे. वैज्ञानिक तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार ही मान्यता देण्यात आली असून, कोव्हॅक्सिन बनविण्यास एक वर्षाचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर ' हॉफकिन्स बायो फार्मा कॉर्पोरेशन' यांनी उत्पादन सुरू करावे; तसेच ' हॉफकीन 'मध्ये या दृष्टीने लशीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments