गर्दी नियंत्रणासाठी दक्षता पथकाची पराकाष्ठा
|
गाडगीळ पटांगण |
वेब टीम नगर : राज्या प्रमाणेच नगर जिल्ह्यातही काल रात्री पासून संचार बंदी लागू करण्यात आली असून आज मात्र शहरात कुठेही फारसे निर्बंध लावल्याचे चित्र दिसत नव्हते.मात्र ठिकठिकाणी भरणारे भाजी बाजार मात्र बंद ठेवण्यात आले होते. गर्दी टाळण्यासाठी हि उपाययोजना केली जात असल्याचे मनपाचे सहाय्यक आयुक्त दिनेश सिनारे आणि दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान यांनी सांगितले.आज सकाळीच मार्केट यार्ड येथील भाजी बाजार व फळ विक्रेते तसेच चाणक्य चौक,गाडगीळ पटांगण,चितळे रोड, सावीडी उपनगरातील एकविरा चौक येथील भाजी विक्रेत्यांना सूचना देऊन भाजी बाजार बंद करण्यात आला.
|
मार्केट यार्ड |
भाजी बाजाराला परवानगी असली तरी एकाच ठिकाणी गर्दी जमवून विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच भाजी व फळ विकर्त्यांना हातगाडी घेऊन फिरत विक्री करण्यास परवानगी असल्याने अनेक भाजी विक्रेत्यांनी या सवलतीचाच उपयोग करून घेतल्याचे दिसत होते.
मनपाच्या दक्षता पथकाने केलेल्या कारवाईत सहाय्यक आयुक्त दिनेश सिनारे,प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, दक्षता पथक प्रमुख शशिकांत नजान, सहाय्यक सूर्यभान देवघडे, अमोल लहारे,राजेष आनंद आदींचा सहभाग होता.
0 Comments