शिवभोजन थाळीस प्रचंड प्रतिसाद

 शिवभोजन थाळीस प्रचंड प्रतिसाद 

वेब टीम नगर : कोरोना निर्बंध कडक करताना सरकारने गरिबांच्या जेवणाची सोय म्हणून शिवभोजन थाळी मोफत देण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या नियमांमुळे लोक तिथपर्यंत पोहचू शकतील का, अशी शंका व्यक्त केली जात असतानाच नगरमध्ये मात्र याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. वेळेआधीच निर्धारित थाळ्या संपल्याने संख्या वाढवून देण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी काही केंद्रांवर थाळ्या संपल्याने पार्सल घेऊन जाण्यासाठी आलेल्या अनेकांना परत जावे लागले. तर कोठे गर्दी झाल्याने पोलिसांनी कारवाईही केली.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने गेल्या लॉकडाऊन  पासून  शिवभोजन थाळी पाच रुपयांना देण्यास सुरवात केली . मात्र, नव्याने निर्बंध लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  ही थाळी मोफत केली आहे. कडक निर्बंधाच्या काळात कोणी उपाशी राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आज पहिल्याच दिवशी नगर जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर या थाळीला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात २९ केंद्रांवरून थाळीचे वितरण करण्यात येत आहे. त्यांची क्षमता साडेतीन हजार थाळी प्रतिदिन अशी आहे. वेगवेगळ्या भागातील केंद्रांना वेगवेगळी क्षमता ठरवून देण्यात आलेली आहे. आज निर्बंधाच्या पहिल्याच दिवशी बहुतांश केंद्रांवरील थाळ्या दुपारी लवकरच संपल्या. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणखी ८०० थाळ्या वाढवून देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पाठविला आहे.


Post a Comment

0 Comments