नागपुरात कोरोना बाधिताची आत्महत्या

नागपुरात कोरोना बाधिताची आत्महत्या  

वेब टीम नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रभाव अतिशय वेगाने वाढत आहे.या प्रभावला रोखण्यासाठी राज्यात आता पूर्ण लॉकडाउन लागण्याची शक्यता आहे. त्यातच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर मध्ये एका कोरोनाबधित रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ही धक्कादायक  घटना सोमवारी सकाळी १० च्या सुमारास पंचशीलनगरमधील मेहरे कॉलनी येथे उघडकीस आली. सुरेश महादेव नखाते  असे मृतकाचे नाव आहे.

या प्रकरणाबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १० एप्रिलला त्यांना सर्दी व खोकला झाला. ते आजारी राहायला लागले. त्यांच्या पत्नी वर्षा यांनी सुरेश यांना करोना चाचणी करण्यास सांगितले. याच दिवशी ते घरून निघाले. घरी परतले नाही. वर्षा यांनी शोध घेतला. सुरेश आढळून आले नाही. वर्षा यांनी अजनी पोलिसांत तक्रार दिली. अजनी पोलिसांनी सुरेश बेपत्ता असल्याची नोंद घेतली.

सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मेहरे कॉलनीतील रेल्वेरुळाजवळ एका इसमाचा मृतदेह असल्याची माहिती सोनेगाव पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मृतकाच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी आढळली. आजरपणाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येस कुणीही जबाबदार नाही असे चिठ्ठीत लिहिले आहे.

पोलिसांनी पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांनी वर्षां यांना माहिती दिली. वर्षा तेथे पोहोचल्या. त्यांनी मृतदेह सुरेश यांचा असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर ओळख पटली. पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. तपासणी केली असता सुरेश हे करोनाबाधित असल्याचे आढळून आले. सुरेश यांच्या शरीरावर रेल्वेच्या धडकेची कोणतीही खूण नाही. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments