जिल्ह्यात कोरोना लस ,रेमेडीसीवरचा तुटवडा

 जिल्ह्यात  कोरोना लस ,रेमेडीसीवरचा तुटवडा 

वेब टीम नगर :  जिल्ह्यात आज अखेर अकरा हजारांवर कोरोनाबाधित असून नगर शहर, राहता, संगमनेर ही ठिकाणे हॉटस्पॉट ठरत आहेत. या परस्थितीत जिल्हा आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह अनेक शासकीय कोविड केअर सेंटर्सवर बेडची उपलब्धता नसल्याने रुग्ण बेडच्या प्रतिक्षेत आहेत.  मुख्य म्हणजे, वाढत्या कोरोना रुग्णांमुळे कोरोना लसीकरणासाठी गर्दी उसळली असताना लस संपल्याने लसीकरण थांबवावे लागले आहे.

 काेराेना प्रतिबंधात्मक लस पाठाेपाठ  रेमडेसिवीरचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे.  काही रुग्णांची आज सायंकाळपासून रेमडेसिवीर औषधासाठी धावपळ सुरू हाेती. तरी देखील त्यांना शहरात औषध मिळाले नाही. त्यामुळे औषधाचा खरच की, कृत्रिम तुटवडा यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नगर जिल्ह्यासाठी नागपूर, पुणे, अहमदाबाद येथून रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा हाेता. जिल्ह्यासाठी १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी विविध मेडिकल एजन्सींकडून नाेंदविण्यात आली. परंतु अजून पुरवठा झालेला नाही. हा पुरवठा कधी हाेईल, हे देखील सांगता येत नाही. त्यामुळे नगरसाठी येणारा काळ अधिकच अडचणीचा ठरणार आहे. 

सध्या जिल्हा रुग्णालयात रेमडेसिवीरची २ हजार५०० इंजेक्शन आहेत. जिल्हा रुग्णालयाव्यक्तिरीक्त नगरमध्ये फक्त ४०० रेमडेसिवीर उपलब्ध आहेत.  अन्न व औषध प्रशासनाकडून दाेन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात रेमडेसिवीर औषधाचा पुरेसा पुरवठा असल्याचे सांगण्यात आले हाेते. औषध मिळत नसल्यास संपर्क क्रमांक देखील जाहीर केला हाेता. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी देखील आज जिल्हा प्रशासनाबराेबर बैठक घेतली.  त्यात देखील काेराेनासाठी लागणारा औषधे उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. विभागीय आयुक्तांची बैठक सुरूच असतानाच रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. अन्न व औषध प्रशासन यावर काय उपाययाेजना करते याकडे लक्ष लागले आहे. Post a Comment

0 Comments