मुंबईत ३ दिवसांचा लसीचा साठा, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा तुटवडा नसल्याचा दावा

 मुंबईत  ३ दिवसांचा लसीचा साठा, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा तुटवडा नसल्याचा  दावा

वेब टीम नवी दिल्लीः देशात कुठल्याही ठिकाणी करोनावरील लसीचा तुटवडा  नाही, असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना लसींचा आवश्यक पुरवठा केला जात  आहे. देशात कुठेही लसींचा तुटवडा नाही, असं असं आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं.

देशात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरही त्यांनी उत्तर दिलं. देशातील करोनाने निर्माण झालेली स्थिती अजूनही नियंत्रणात आहे. पण नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, असं ते म्हणाले.

हर्षवर्धन यांनी मंगळवारी ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. देशात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३८ टक्के आहे. तर मृत्यू दर हा १.३० टक्के आहे. गेल्या २ महिन्यांत देशात करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली. करोना रुग्ण वाढीमागे नागरिकांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या काही उणीवा आहेत. पण देशातील करोनाची स्थिती नियंत्रणात आहे, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments