गुजराथला लॉकडाऊनची गरज : उच्च न्यायालय

 गुजराथला लॉकडाऊनची गरज:उच्च न्यायालय 

वेब टीम अहमदाबाद : देशाच्या करोना संक्रमणाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसून येत असून अनेक राज्यांत पुन्हा एकदा लॉकडाऊन, विकेन्ड कर्फ्यू किंवा तत्सम उपायांची गरज पुन्हा एकदा दिसून येतेय.गुजरात उच्च न्यायालयानं ही गरज अधोरेखित केलीय. भाजपशासित गुजरातमध्ये वाढत्या करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाकडून लॉकडाऊन लावण्याची गरज व्यक्त केलीय.

उच्च न्यायालयासमोर करोना संकटासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर, राज्यात करोना संकट रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणं गरजेचं आहे, असं म्हणत उच्च न्यायालयानं ढिम्म राज्य सरकारला चपराक लावलीय.राज्यात तीन - चार दिवसांचा किंवा विकेन्ड कर्फ्यू लावण्याची गरज असल्याचं गुजरात उच्च न्यायालयानं म्हटलंय. राज्यात करोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याचं आणि त्यासंबंधी राज्य सरकारनं लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देशही उच्च न्यायालयानं दिलेत.

गुजरातमध्ये प्रत्येक दिवशी समोर येणाऱ्या रुग्णांचा आकडा होळीनंतर १००० च्या पुढे गेलाय. सध्या राज्यात १६ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सूरत शहरात परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचं दिसून येतंय. शहरात जवळपास ४००० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर रुग्णसंख्येच्या बाबतीत अहमदाबाद, वडोदरा, राजकोट यांसारख्या शहरांचा क्रमांक लागताना दिसतोय.राज्य सरकारनं रुग्णालयांत करोना रुग्णांसाठी बेडस् रिझर्व्ह करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी रुग्णालय आणि इतर ठिकाणी प्रती मास्क एक रुपये किंमतीला विकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुजरातमध्ये आतापर्यंत ३ लाख २१ हजार ५९८ नागरिकांना करोनानं गाठलंय. यातील १६ हजार २५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३ लाख ७६५ नागरिकांना करोनावर यशस्वी मात केलीय. तर आतापर्यंत ४५८१ रुग्णांनी करोना संक्रमणामुळे आपले प्राण गमावल्याचं आकडेवारी सांगतेय.

Post a Comment

0 Comments