घरगुती वादातून पत्नीचा खून

  घरगुती वादातून पत्नीचा खून 

 वेब टीम नगर : घरगुती कारणातून वादात पत्नीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी (दि.४) घडली. मयत महिलेचे नाव लता संतोष पटोरकर असे असून आरोपीचे संतोष परसराम पटोरकर (वय.२८ वर्षे.रा.बिबामल ता. धारनी जि.अमरावती ) असे नाव आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर एमआयडीसी येथील ब्रीज इंडस्ट्रीज प्लाँट नं डी.१५ , सिक्युरीटी कँबीनमध्ये शनिवारी (दि.३ एप्रिल) राञी ११ वाजण्याच्या नंतर रविवारी (दि.४ एप्रिल) दरम्यान आरोपी संतोष परसराम पटोरकर याने त्यांचे घरगुती अगर वैयक्तीक कारणावरुन त्याची पत्नी लता संतोष पटोरकर हीचा कशानेतरी गळा आवळून तिला जीवंत ठार मारले आहे, या भागीनाथ सुर्यभान कराळे ( रा.डेंन्टल काँलेज शेजारी धुमाळ माथा वडगाव गुप्ता ता.जि.अ.नगर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील अधिक तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि आठरे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments