काय घडलं टेकलगुडा गावात ' त्या दिवशी '

काय घडलं टेकलगुडा गावात  ' त्या दिवशी '

छात्तीसगडमधील बिजापूर -सुकमा जिल्हात घडलेल्या माओवादी आणि सुरक्षा रक्षकदलाच्या जवानांमधील चकमकीचा ग्राऊंड रिपोर्ट 

वेब टीम बिजापूर :  छत्तीगसढमधल्या बीजापूर - सुकमा जिल्ह्याच्या सीमेनजिक जोनागुडा गावाजवळ रविवारी माओवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात २२ जवान शहीद झाले. गेल्या चार वर्षांत माओवाद्यांकडून करण्यात आलेला हा सर्वात मोठा हल्ला ठरलाय. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ४०० माओवादी टेकलगुडा गावाच्या डोंगरांवर आणि आजुबाजुला उपस्थित होते. एका विशेष मोहिमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांच्या पथकाला या घात लावलेल्या माओवाद्यांनी घेरलं आणि त्यांच्यावर बंदुकांनी गोळ्यांच्या फैरीच्या फैरी झाडल्या. या हल्ल्यात २२ जवान शहीद झाले तर ३१ जण जखमी झाले आहेत.

या ऑपरेशनमध्ये बीजापूर जिल्ह्यातील तररम, उसूर तसंच सुकमा जिल्ह्यातील मिनपा, नरसापुरम भागात तैनात सीआरपीएफ, कोब्रा, एसटीएफ आणि डीआरजीचे २००० जवान सहभागी होते. 'पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी'च्या (पीएलजीए) बटालियन क्र. १ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलाचा म्होरक्या - माओवादी कमांडर हिदमा आणि त्याची सहकारी सुजाता यांची हे या भागात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी ऑपरेशन सुरू केलं होतं

माओवादी लपून बसल्याची माहिती मिळताच जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. टेकलगुडा गावापासून १०० मीटर अंतरावर असताना अचानक त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरू होता. टेकलगुडा गावाच्या एका बाजुला डोंगर तर तीन बाजुंना दाट जंगल आहे. माओवाद्यांनी उंचावरची ठिकाणं काबीज करून गोळीबार सुरू केला होता.

चकमकी दरम्यान सुरक्षा दलाकडून गावाच्या दिशेनं अंधाधुंद फायरींग केली जात नाही. त्यामुळे माओवाद्यांकडून अचानक हल्ला झाल्यानंतर काही जवानांनी गावाकडे धाव घेतली. परंतु, या गावातून गावकरीही गायब झाले होते. माओवाद्यांनी गाव रिकामं करून त्यांच्याजागी फायरिंग पोझिशन घेतली होती आणि ते सुरक्षा दलाची वाट पाहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शहीद जवानांचे रक्तबंबाळ मृतदेह शेत आणि गावातील रस्त्यांजवळ आढळले. काही जवानांना गोळी लागल्यानं त्यांचा मृत्यू झाला होता तर काही जवानांच्या मृतदेहावर धारदार हत्यारानं हल्ला करण्यात आला होता. जवळपास एक किलोमीटर परिसरात जवानांचे मृतदेह ठिकठिकाणी पडले होते. माओवाद्यांकडून हल्ल्यासाठी बंदुकी, एलएमजी, रॉकेट लॉन्चर, बीजीएल, यूजीएफ आयईडी अशा हत्यारं आणि स्फोटकांचा वापर करण्यात आला होता.

रविवारी दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला हा हल्ला संध्याकाळपर्यंत सुरू होता. चकमकीत जवळपास ३० माओवादी मारले गेल्याचा अंदाज सीआरपीएफ महासंचालकांनी व्यक्त केलाय. एका महिला माओवाद्याचा मृतदेह इन्सास रायफलसोबत आढळला. तिची ओळख माडवी वनोजा अशी करण्यात आलीय. माओवादी गटाची ती एक कमांडर असल्याची माहिती मिळतेयशहीद जवानांची हत्यारांची लूट

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, माओवाद्यांनी शहीद जवानांचे पोशाख, बूट आणि हत्यारंही लूटले आहेत. ७ एके ४७ रायफल, दोन इन्सास रायफल आणि एक एलएमजी त्यांनी पळवली आहे. चमकीदरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी आपल्या जखमी झालेल्या सहकाऱ्यांना वाचवण्याचेही प्रयत्न केले. त्यांच्या रक्ताळलेल्या ठिकाणी पट्या बांधल्या. गावाजवळ अनेक ठिकाणी इंजेक्शन, सीरिंज आणि औषधही आढळली आहेत.

बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून जिल्हा राखीव रक्षक दलाच्या आठ जवानांचे, केंद्रीय राखील पोलीस दलाच्या कोब्रा बटालियनच्या सात जवानांचे, केंद्रीय राखील पोलीस दलाच्या बस्तरिया बटालियनच्या एक जवानाचं तसंच स्पेशल टास्क फोर्सच्या  सहा जवानांचे मृतदेह आढळले आहेत. तसंच कोब्रा बटालियनचा एक जवान बेपत्ता आहे. वायुसेनेच्या मदतीनं शहीद जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Post a Comment

0 Comments