कोरोना महामारीत जगण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता

कोरोना महामारीत जगण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता 

अतुल फलके : निमगाव वाघात कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी जनजागृती ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप

वेब टीम नगर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन एकता सामाजिक फाऊंडेशन व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे ग्रामस्थांना मास्क व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मार्गदर्शन करुन जागृती करण्यात आली.  

राष्ट्रीय कुस्तीपटू प्रियंका डोंगरे हिच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी एकता सामाजिक फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, महानगर बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर किसन शिंदे, भाऊसाहेब ठाणगे, अरुण अंधारे, भागचंद जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, रघुनाथ डोंगरे, राधुभाऊ जाधव, मयुर काळे, आकाश पुंड आदी उपस्थित होते.

अतुल फलके म्हणाले की, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोना संक्रमणाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून, जगण्यासाठी जागृक राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा वापर, योग्य आहार, व्यायामाबद्दल मार्गदर्शन करुन नियमांचे पालन करण्याचे त्यांनी आवाहन केले. पै.नाना डोंगरे यांनी निष्काळजीपणा कोरोना वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. गावात सर्वांनी नियमाचे पालन केल्यास स्वत:चा व कुटुंबीयांचा बचाव होणार आहे. युवकांनी एकत्रे येऊन गावात घेतलेल्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.(फोटो- आर डब्ल्यू एस -३७७१)

Post a Comment

0 Comments