आरोग्य आहार : राजमा सॅलड
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत नाही. व्यायामासह आहारावर देखील लक्ष दिले पाहिजे. योग्य आणि पोषक आहार घ्यावा. जेणे करून शरीर निरोगी राहील. या साठी सांगत आहोत, राजमा सॅलड जे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच, या मध्ये प्रथिने देखील मुबलक प्रमाणात आढळतात. चला तर मग जाणून घेऊ या .
साहित्य :
२५० ग्रॅम राजमा, एक बारीक चिरलेला कांदा, एक चिरलेला टोमॅटो, एक शिमला(ढोबळी) मिरची बारीक चिरलेली, एक काकडी चिरलेली, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिनाची पाने चिरलेली, शेंगदाणे, काजू, अक्रोड, बेदाणे, बदाम, लिंबाचा रस, मीठ, काळीमिरपूड आणि चाट मसाला.
कृती : राजमा रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी स्वच्छ करून घ्या. उकळवून घ्या. एका भांड्यात सर्व चिरलेल्या भाज्या एकत्र करा. त्यात उकडवून ठेवलेला राजमा घाला. भाजलेले शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे, मीठ, काळी मिरपूड, आणि चाट मसाला घालून मिसळा. १०मिनिटे तसेच ठेवा नंतर खाण्यासाठी सर्व्ह करा. चविष्ट आणि आरोग्याने समृद्ध हे सॅलड सर्वांना आवडेल.
1 Comments
Good recipe of Rajama salad its healthy one
ReplyDelete