आरोग्य आहार
खमंग खुसखुशीत कांदा मठरी
चहा बरोबर खाण्यासाठी काही तरी नवीन आणि चविष्ट लागते. दररोज बिस्किट खाणे देखील योग्य नाही. आपण पालक किंवा मेथीच्या मठरी बऱ्याच वेळा खालल्या असतील पण आज आम्ही सांगत आहोत कांद्याची मठरी बनवायला. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य :
१ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला, दीड कप मैदा, २ चमचे गव्हाचे पीठ, २ चमचे हरभराडाळीचे पीठ, २ चमचे रवा, १ लहान चमचा जिरे, १/४ चमचे ओवा.चिमूटभर हिंग, २ चमचे मेथीचे कोरडे पाने.मीठ चवीप्रमाणे,३ चमचे गरम तूप, तळण्यासाठी तेल,
कृती :
सर्वप्रथम एका भांड्यात गव्हाचं पीठ, मैदा,हरभराडाळीचे पीठ रवा,जिरे,ओवा,हिंग, मेथी,कांदा, मीठ आणि तूप मिसळून लागत लागत पाणी घालून घट्ट कणीक म्हणून घ्या. हे १०ते १५ मिनिटे झाकून ठेवून द्या. आता कणकेचे गोळे बनवून पुरी किंवा इतर आकार देऊन लाटून घ्या आणि काट्याने छिद्र करा.
एका कढईत तेल तापविण्यासाठी ठेवा आणि तेल तापल्यावर या लाटलेल्या पुऱ्या तळून घ्या आणि सोनेरी होई पर्यंत तळून घ्या.तळलेल्या पुऱ्या काढून अतिरिक्त तेल काढून घ्या. आता कांद्याची मठरी खाण्यासाठी तयार. हवाबंद डब्यात बंद करून ठेवा.
1 Comments
Very nice. Kandyacha mathari
ReplyDelete