अहमदनगर कोरोना अपडेट

अहमदनगर कोरोना अपडेट 

१६८० बाधितांची रुग्ण संख्येत भर तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.६४ टक्के.

वेब टीम नगर : जिल्ह्यात आज १३३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ९९० इतकी झाली आहे.रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.६४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान  जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १६८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६७१४ इतकी झाली आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये  ६७७ रुग्ण.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५१४ रुग्ण. अँटीजेन चाचणीत  ४८९ रुग्ण  बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २६४, अकोले ४२, जामखेड २९, कर्जत २०, कोपरगांव १, नगर ग्रामीण २५, नेवासा १०, पारनेर ३३, पाथर्डी २, राहता ९३, राहुरी १८, संगमनेर ४७, श्रीगोंदा १९, श्रीरामपूर ४९,  कॅंटोन्मेंट बोर्ड ९, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि  इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १४३, अकोले ८, जामखेड २, कर्जत २, कोपरगांव ७१, नगर ग्रामीण १८, नेवासा ८, पारनेर १४, पाथर्डी ५, राहाता १०३, राहुरी १७, संगमनेर ५५, शेवगांव ४, श्रीगोंदा ९, श्रीरामपूर ४४, कॅंटोन्मेंट ३ आणि इतर जिल्हा ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४८९ जण बाधित आढळुन आले. मनपा २६, अकोले ११, जामखेड ६, कर्जत ७९, कोपरगांव ४२, नगर ग्रामीण ३१, नेवासा ३७, पारनेर १३, पाथर्डी ५६, राहाता ३३, राहुरी ५६, संगमनेर ३, शेवगांव ५७ श्रीगोंदा ९, श्रीरामपूर २३, कॅंटोन्मेंट बोर्ड ४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये

मनपा ४५७, अकोले ७४, जामखेड ३७, कर्जत १५,  कोपरगाव १०१, नगर ग्रामीण ५१, नेवासा २४, पारनेर ४६, पाथर्डी ३०, राहाता १४०, राहुरी २६, संगमनेर १४८,  शेवगांव ७१, श्रीगोंदा १९,  श्रीरामपूर ६९, कॅन्टोन्मेंट १४ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

 कोरोना अपडेट 

बरे झालेली रुग्ण संख्या : ८६९९०

उपचार सुरू असलेले रूग्ण :६७१४

मृत्यू : १२१८

एकूण रूग्ण संख्या : ९४९२२

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा.

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा.

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा.

Post a Comment

0 Comments