पंधरा वर्षापुढील वाहनांना स्क्रॅप करणारा कायदा रद्द व्हावा

पंधरा वर्षापुढील वाहनांना स्क्रॅप करणारा कायदा रद्द व्हावा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने निवेदन

या कायद्याने गोर-गरिबांची परवड होणार असल्याचा आरोप

वेब टीम नगर : पंधरा वर्षापुढील वाहनांना स्क्रॅप करणारा कायदा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी प्रदेश समन्वयक नामदेवराव चांदणे, संजय भोसले, जिल्हा उपाध्यक्ष उमेश साठे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट, विजय पाथरे, गणेश ढोबळे, जालिंदर उल्हारे, कैलास साळवे, रमेश शेंडगे, सनी साळवे, भाऊसाहेब साळवे आदी उपस्थित होते.        

केंद्र सरकारने नवीन कायद्यान्वये पंधरा वर्षाच्या पुढील चार चाकी व दोन चाकी वाहन रस्त्यावर चालवता येणार नसून, ते स्क्रॅप करण्याची तरतुद केली आहे. होत असलेल्या प्रदुषणाचे कारण पुढे करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना दर पंधरा वर्षांनी नवीन वाहन विकत घ्यावे लागणार आहे. देशात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या असून, त्याद्वारे देखील मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. शेतकरी, कामगार मेहनत करुन वाहन खरेदी करतो. शक्य न झाल्यास कमी किंमतीत जुने वाहन घेत असतो. मात्र या काद्यामुळे गरिबांना दर पंधरा वर्षानंतर वाहन घेणे परवडणार नाही. वाहनांवर फक्त श्रीमंतांचीच फक्तेदारी राहणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. केंद्र सरकारने या कायद्याचा विचार करुन पंधरा वर्षापुढील वाहनांना स्क्रॅप करणारा कायदा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. हा कायदा रद्द करता येत नसेल तर दर पंधरा वर्षांनी गोर-गरीबांना वाहने खरेदी करण्यास अनुदान देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.(फोटो-डीएससी-००६०)

Post a Comment

0 Comments