योगसाधना : सुप्त वीरासन -२

योगसाधना : सुप्त वीरासन -२ 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सुप्त वीरासन -२ 

सुप्त म्हणजे निजलेला या आसनामध्ये जमिनीवर पालथे झोपून डोक्याच्या मागे हात लांब व्हायचे असतात. 

 पद्धती : 

१) वीरासना मध्ये बसा .श्वास सोडा धड पाठीमागे झुकवा प्रथम एक कोपरा आणि नंतर दुसरे कोपर जमिनीवर टेकवा.  

२) हात लांबवून प्रथम एक कोपरा वरील आणि नंतर दुसरा कोपरा वरील भार हलका करा. 

३)प्रथम टाळू जमिनीवर टेकवा हळूहळू डोक्याची मागची बाजू आणि नंतर पाठ जमिनीवर टेकवा हात डोक्यावरून पलीकडे न्या आणि सरळ मागे पसरा दीर्घ श्वसन करत या स्थितीत शक्य तितका अधिक वेळ राहा. हात धडाच्या शेजारी ठेवा.  कोपरे जमिनीवर दाबा आणि श्‍वास सोडून पुन्हा बसा.  

४) हात डोक्यावरून पलीकडे ताणावेत  किंवा  मांड्याच्याजवळ ठेवावेत डोक्यावरून पलीकडे हात ताणलेले असताना खांद्याची पाती जमिनीवरून उचलू नयेत. नवशिक्यांनी गुडघे एकमेकापासून दूर ठेवले तरी चालतील. 

 परिणाम : या आसनामुळे पोटातील अवयव आणि ओटीपोटाचा भाग ताणला जातो ज्यांच्या पायांमध्ये कळा येतात अशा व्यक्तींनी १० ते १५ मिनिटे हे आसन केल्यामुळे आराम वाटेल व्यायाम प्रेमी व्यक्ती आणि त्यांना दीर्घकाळ चालावे किंवा उभे राहावे लागते अशा व्यक्ती यांना हे आसन  उपयुक्त आहे हे जेवणानंतरही करता येते आणि रात्री झोपण्यापूर्वी हे आसन  केले तर दुसर्‍या दिवशी सकाळी पायाचा थकवा गेलेला आढळतो . Post a Comment

0 Comments