फॅशनट्रेंड:आगामी वर्षात हे पेहराव खुलवतील तुमचे सौंदर्य
मैत्रिणींनो आगामी वर्षात कुठल्या फॅशन ट्रेंड चालतील त्याचा विचार करता जे ट्रेंड्स चालतील असा अंदाज आहे त्यातच इन्व्हेस्ट करून आपलं वार्डरोब सजविल्यास हे ट्रेंड आपलं सौंदर्य खुलवतील यात शंका नाही.
बॅगी जीन्स आगामी वर्षभरात ही फॅशन पुन्हा येईल. त्यातही हायवेस्ट जीन्सचा जमाना पुन्हा सुरू होईल. जेणेकरून सैलसर पेहरावात आपल्याला अधिक आरामदायी वाटेल तेव्हा बॅगी जीन्स मध्ये हायवेस्ट जीन्स , लूज फिटिंग ,बेलबॉटम जीन्सचा जमाना येतोय. ज्या मैत्रिणींच्या पोटाचा घेर वाढलाय त्यांनाही सुखावह असणारा हा ट्रेंड सर्वाधिक चालणार असून कोणत्याही वयातील मैत्रिणींचे सौंदर्य खुलावतील यात शंका नाही. गेल्या काही वर्षात सुरू असलेला टाइट फिटिंग जीन्सची जागा आता बॅगी जीन्स घेतील.
निऑन कलर : एथनिक वेअरचा ट्रेंड ही यावर्षी जोर धरील त्यातही लेमन कलर.पॅरेट कलर , पीच कलर, लाईट ऑरेंज अशी मोठी रेंज बाजारात उपलब्ध असून या रंगाचे एथनिक वेअर , टॉप, साड्यांची रेलचेल दिसणार आहे . या मटेरियल मध्ये शिवलेले लेंहगे ,शरारा विशेष समारंभात आपले सौंदर्य खुलवतील यात शंका नाही.
पफ स्लीव्ह : एथनिक वेअर मध्ये तसेच लांब टॉप मध्ये ही पफ स्लीव्हला मोठी पसंती मिळणार आहे. जेणेकरून लॉकडाऊनच्या काळात शरीरावर नियंत्रण न राहिलेल्या व्यक्ती ही आपल्या दंडाचे आकार पफ स्लीव्हच्या माध्यमातून झाकू शकतील तसेच ज्यांचे दंड अधिक बारीक आहेत त्याही व्यक्ती आपल्यातील वैगुण्य लपवू शकतील .पफ स्लीव्ह मधील क्रॉप टॉप ,अनारकली, लॉँगटॉप आपल्या पेहरावाला वेगळा लुक देतील .
0 Comments