आरोग्य आहार
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पनीर टिक्का
साहित्य : २०० ग्रॅम पनीर, १००ग्रॅम दही, २५ ग्रॅम मैदा, लसूण, आलं ,अर्धा चमचा जिरे पावडर ,अर्धा चमचा गरम मसाला, एक मिलिग्रॅम ऑरेंज कलर,५० ग्रॅम बटर,७५ ग्रॅम टोमॅटो ,३० मिली क्रीम, अर्धा चमचा लाल मिरची ,अर्धा चमचा कसुरी मेथी ,मीठ.
कृती : दह्या मध्ये ऑरेंज कलर ,मैदा, मीठ व मसाला घालावा. पनीरचे तुकडे तळावेत एका पातेल्यात लोणी टाकून त्यात आलं, लसूण टाकून दोन मिनिट भाजल्यावर कापलेले टोमॅटो लाल मिरची पावडर टाकून परत भाजावे ,नंतर दही क्रीम टाकून भाजावे. त्यावर तूप सोडल्यावर कसूरी मेथी टाकावी . पनीर बाउलमध्ये जमवावे त्यावर क्रीम व कोथिंबीर टाकून सजवावे तयार आहे पनीर टिक्का. तयार पनीरचा तुकडा शिमला मिरचीचे तुकडे घालून एकाच एक अडकवू शकता.
0 Comments