बाळ बोठेची रवानगी पारनेर तुरुंगात
वेब टीम नगर : खंडणीच्या गुन्ह्यात बाळ बोठेला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी कोर्टाच्या निगराणीखालील पारनेरच्या जेलमध्ये झाली आहे . पारनेर, पुणे आणि अहमदनगरच्या सब जेल मध्ये न ठेवता इतर कुठेही ठेवा अशी मागणी त्याने कोर्टाकडे केली असून त्याच्यावर पुढच्या काही दिवसात निर्णय होण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यशस्वी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार हा बाळ बोटेच असल्याची बाब तपासात समोर आली आहे रेखा जरे हत्या प्रकरणात फरार असतांना त्याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्याकांडानंतर तीन महिन्यांपासून फरार होता. त्याला जिल्हा पोलिसांनी हैदराबाद येथून अटक केली होती. तर पारनेर न्यायालयात बोठेला हजर करण्यात आले असता त्याला प्रथम सात नंतर तीन व दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती ती कोठडी संपल्याने पोलिसांनी त्याला पारनेर न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायाधीश उमा बोराडे यांनी बोठेला न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात वर्ग करून एक दिवसाची पोलीस कोठडी दिली ही कोठडी संपताच त्याला तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले होते.
दोन दिवसाची पोलीस कोठडी मुदत संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते . आणखी तपासासाठी पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी तपासी अधिकारी सुनील गायकवाड यांनी केली तर खंडणीचा गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून फिर्यादी महिलेने त्यावर पडदा पाडला असून त्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर करण्यात आले . त्यानंतर कोर्टाने बोठे ला न्यायालयीन कोठडी सुनावली त्याला मूळ खुनाच्या गुन्ह्यात पोलीस पुन्हा पारनेर ला कोर्टाच्या निगराणी खाली त्याचा मुक्काम असणार आहे. दरम्यान त्याने पारनेर पुणे आणि नगर च्या सब जेल मध्ये न ठेवता इतर कुठे ठेवावा असा अर्ज दिला आहे त्यावर पुढच्या काही दिवसातच निर्णय होण्याची माहिती समोर येत आहे.
0 Comments