नगरटुडे बुलेटीन 28-03-2021

  नगरटुडे  बुलेटीन 28-03-2021

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावा ; महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरातांचे मनपा आयुक्तांना आदेश 

वेब टीम नगर : केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा. त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आर्थिक नियोजन करा. राज्य सरकारच्यावतीने लागेल ती मदत करण्यासाठी मी पुढाकार घेईल. पण महानगरपालिकेने यातला जास्तीत जास्त वाटा उचलावा, असा आदेश महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांना दिले आहेत. 

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या मागणीवरून ना. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्योजकांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ना. थोरातांनी हे आदेश दिले. 

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे, आयुक्त शंकर गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार उमेश पाटील, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंतराव गारदे, फारुख शेख, हनीफ शेख, प्रवीण गीते, अक्षय कुलट, अनिस चुडीवाला, अज्जू शेख, निजाम जहागीरदार, वाहिद शेख, शरीफ सय्यद, मोहन वाखुरे, गणेश आपरे आदी उपस्थित होते. 

केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष सतीश बोरा, तज्ञ संचालक अरविंद गुंदेचा, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष प्रकाशशेठ गांधी, ॲड. राजे, सुनीत मुनोत, मेहुल भंडारी, संतोष बोरा, नरेश गांधी, नितीन पटवा, दिलीप कटारिया आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित होते. 

उद्योजकांची बाजू मांडताना काळे म्हणाले की, इंडस्ट्रियल इस्टेट सुमारे ५१ एकर क्षेत्रावर आहे. १४० पेक्षा जास्त कारखाने येथे सध्या सुरू आहेत. ३००० पेक्षा जास्त लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून येथे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या वसाहतीमध्ये सुमारे ५ ते ६ किलोमीटर सिमेंटचे रस्ते करण्याची मागणी यावेळी काळे यांनी मांडली. त्यासाठी अंदाजे तेरा ते चौदा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

यावेळी मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी याबाबतचा निधी मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवू असे बैठकीत सांगितले. त्यावर काळे यांनी आक्षेप घेत महानगरपालिकेला उद्योजक दरवर्षी सुमारे पाच ते सहा कोटींचा कर देतात. मागील दहा वर्षांमध्ये सरासरी ६० कोटी पेक्षा अधिक कर उद्योजकांनी दिलेला असताना देखील महापालिकेने जबाबदारी झटकण्याचे कारण नाही. महापालिकेने यासाठी स्वतः तरतूद करावी. वसाहतीतील ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट बसविण्याची मागणी देखील मागणी काळे यांनी यावेळी केली.

नगरची महानगरपालिका चालते कशी ? ना.बाळासाहेब थोरात यांचा आयुक्तांना बैठकीत सवाल

एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर उद्योजक कर महानगरपालिकेला देत असतील तर हा पैसा जातो कुठे ? याचा विनियोग कसा होतो ? असे ना. बाळासाहेब थोरात यांनी आयुक्तांना विचारताच आयुक्त निरुत्तर झाले. उद्योजकांच्या रस्त्यांचा प्रश्न सोडवताना महानगरपालिकेने मोठी तरतूद करावी. निधी कमी पडला तर मी राज्यातून तो देण्यासाठी मदत करील. मात्र महापालिकेने यासाठी मोठा वाटा उचलावा असा आदेश यावेळी ना. थोरात यांनी आयुक्तांना फर्मावला. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

निमगाव वाघा विविध कार्यकारी सोसायटीची सभा उत्साहात

थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे आवाहन : शेतकर्‍यांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचा संकल्प

वेब टीम नगर :  नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील विविध कार्यकारी सेवा सह. सोसायटीची सभा संस्थेचे अध्यक्ष संतोष फलके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष  शिवाजी फलके, सोसायटीचे सदस्य पै.नाना डोंगरे, साहेबराव बोडखे, अण्णा जाधव, अरुण काळे, मच्छिंद्र जाधव, अनिल फलके, द्रोपदाबाई कापसे, सुनिल कापसे, आशाबाई ठाणगे, भारत फलके, लहू गायकवाड आदी संचालक उपस्थित होते.

संस्थेचे सचिव विजय सोनवणे यांनी शासकीय विविध योजनांची माहिती देऊन कर्ज भरणार्‍या सभासदांचे आभार मानण्यात आले. सहाय्यक मनोहर गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या सभेत थकबाकी संदर्भात चर्चा करुन वसुली करण्याचे आवाहन करण्यात आले. सभासदांच्या अडी-अडचणी संदर्भात चर्चा करुन शेतकर्‍यांना जास्तीत जास्त कर्ज देण्याचा संकल्प करण्यात आला. आभार पै.नाना डोंगरे यांनी मानले.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोरोनाचा नायनाट करण्यासाठी साईबाबांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही 

 सुनिल त्र्यंबके : गुरुवारी साई-मंदिरात भक्तांनी घातले दंडवत

    वेब टीम  नगर : २०२० हे वर्ष कोरोना आला, कोरोना झाला तरी आपण सर्व जण लढलो २०२१ मध्ये तरी कोरोना जाईल, असे वाटले पण पुन्हा आठवडा भरापासून रुग्ण संख्येत वाढ होत असून, आता सबका मालिक एक आपले साईबाबांनाच कोरोनाचा नायनाट करावा लागेल, त्यासाठी त्यांना शरण गेल्याशिवाय पर्यायच नाही, असे भावनिक उद्गार साईसंघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनिल त्र्यंबके यांनी काढले.

     संस्थापक अध्यक्ष त्र्यंबके यांच्या हस्ते आरती करुन भक्तांनी साईबाबांच्या चरणी लीन होत कोरोना जाऊ द्या अशी प्रार्थना केली.  यावेळी साई-भक्तांनी देखील बाबांना दंडवत घालून कोरोनाचे संकट लवकर दूर करा, अशी प्रार्थना केली.

     पुढे बोलतांना  त्र्यंबके म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून साई मंदिरात शेवटच्या गुरुवारी आरती, महाप्रसाद, भजनसंध्या असे कार्यक्रम सुरु होते. मात्र कोरोनामुळे नियमानुसार महिला दिन, भजनसंध्या कार्यक्रम रद्द करुन फक्त आरती व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. कोरोनाचे संकट दूर होताच पुर्वीप्रमाणे कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्यात येतील, असे सांगितले.

     यावेळी सचिव योगेश पिंपळे म्हणाले की, संदेशनगरमध्ये शिर्डीप्रमाणे साईबाबांचे मंदिर उभारले महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी अनेक मान्यवर व्यक्तींच्या हस्ते महाआरती, महाप्रसादासाठी अनेक दानशूर व्यक्ती उपस्थित राहतात. धार्मिक कार्यक्रमासाठी भाविकांचे मोठे योगदान लाभते तर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती या सोहळ्यास उपस्थित राहत असतात. या वेळेस प्रथमच सर्व कार्यक्रम रद्द करुन फक्त कोरोनाच्या संकटातून मुक्त होण्यासाठी भक्तांनी दंडवत घालून प्रार्थना केली, असे सांगितले.

     आरती झाल्यानंतर भाविक देखील खूप भावनिक झाले होते. सोशल डिस्टन्स ठेवून, मास्क बांधून सॅनिटायझिंग करुनच प्रसादाचा लाभ भक्तांनी घेतला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रीडा व राजकारण क्षेत्रात आमदार अरुण जगताप आज अग्रस्थानी : प्रा. शिरीष मोडक

वेब टीम नगर : गेल्या अनेक वर्षापासून शहराचे प्रश्न सोडववून विकास कामांना प्राधान्य देणारे आमदार अरुण जगताप यांचे नगरच्या विकासात मोठे योगदान आहे. कोणताही भेदभाव न ठेवता आलेल्या प्रत्तेकाचे ते प्रश्न सोडवत असतात. सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रीडा व राजकारण अशा सर्वच क्षेत्रात आमदार अरुण जगताप आज अग्रस्थानी आहेत. हिंद सेवा मंडळाच्या शाळा व महाविद्यालयांना वेळोवेळी सहकार्य करत मोठा आमदार निधी त्यांनी दिला आहे. हिंद सेवा मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आज जे अत्याधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळत आहे त्यात आमदार जगताप यांचे बहुमोल योगदान आहे, असे गौरोद्गार प्रा. शिरीष मोडक यांनी काढले.

हिंद सेवा मंडळाच्या वतीने आमदार अरुण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा यांनी सत्कार करून अभिष्टचिंतन केले. यावेळी अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, दादाचौधरी विद्यालयाचे अध्यक्ष  सुमतिलाल कोठारी, पेमराज सारडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे, प्रबंधक अशोक असेरी, पर्यावेक्षक डॉ.सुजित कुमावत, ज्ञानेश्वर रासकर आदी उपस्थित होते. यावेळी आ.अरुण जगताप यांनी सर्वांचे आभार मानले.

अजित बोरा म्हणाले, शाळांमध्ये विविध सुविधांसाठी आमदार अरुण जगताप यांच्या कडे आम्ही जेव्हा जेव्हा निधीची मागणी केली तेव्हा प्रत्येकवेळी तत्परतेने आमच्या मागण्या मान्य करत विकास निधी दिला आहे. मंडळाच्या शाळांच्या प्रगतीसाठी मोठे सहकार्य जगताप कुटुंबीय करत आहेत.

सुमतिलाल कोठरी म्हणाले, आमदार अरुण जगताप हे नगरकरांनचे हक्काचे आमदार आहेत. सर्व जाती धर्माला बरोबर घेत ते नागरिकांच्या समस्या सोडवत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा हिंद सेवा मंडळाला अभिमान आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर काँग्रेसचा असेल : ना. बाळासाहेब थोरात 

वेब टीम नगर  : काँग्रेस हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा शास्वत विचार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.  किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पक्षाची सुरू असणारी संघटनात्मक घोडदौड अशीच कायम राहिली तर वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर देखील काँग्रेसचा होईल, असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. 

शहर जिल्हा काँग्रेची  संघटनात्मक आढावा बैठक ना. थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे होते. 

यावेळी बोलताना ना.थोरात म्हणाले की संघटनात्मक फेरबदल करत असताना नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या रूपाने नवीन दमाचा चेहरा पक्षाने दिला आहे. शहरामध्ये काँग्रेस जोमाने काम करत आहे. मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. शहरातल्या विविध घटकांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व ताकद काळे यांच्या पाठीशी उभी केली जाईल. 

ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी असिर  यांच्या नंतर नगर शहरामध्ये विधानसभेमध्ये काँग्रेसच्या वतीने जाण्याची क्षमता असणारा चेहरा म्हणून किरण काळे यांच्याकडे नगर शहर पाहत आहे असे नमूद केले. त्याचा धागा पकडत ना.बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठरवलं तर ही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे काळे यांचे भवितव्य उज्वल आहे. 

यावेळी बोलताना किरण काळे यांनी ना. बाळासाहेब थोरात यांच्या समोरच महानगरपालिकेतील भाजप-राष्ट्रवादी अभद्र युतीवर सडकून टीका केली. राज्यात महाविकास आघाडी एकत्र असताना शहरात मात्र चुकीच्या पद्धतीने मित्रपक्ष वागत आहे. काँग्रेस शहरामध्ये त्यामुळे विरोधी बाकावर असून नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी आक्रमक भूमिका घेत असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले.  

ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलिल सय्यद, सरचिटणीस नलिनी गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे जाहिद शेख आदींची यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट यांनी केले.

यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, ज्ञानदेव वाफारे, दीप चव्हाण, राजेंद्र नागवडे, संपतराव म्हस्के, फारुख शेख, अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, निजाम जहागीरदार, गणेश आपरे, शंकर आव्हाड, जरीना पठाण, उषा भगत, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष अज्जू शेख, सेवादल अध्यक्ष डॉ.मनोज लोंढे, नलिनी गायकवाड, महिला सेवादल अध्यक्ष कौसर खान, सुमन कालापहाड, शबाना शेख, भिंगार काँग्रेसचे कॅ. रिजवान शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्वयंसेवी संघटना सोमवारी होळीला करणार राष्ट्रीय चेतना गॅझेट प्रसिध्द

उन्नतचेतनेने समाजाचा सर्वांगीन विकास साधण्याचे केले जाणार आवाहन

वेब टीम नगर : पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सोमवार दि.२९ मार्च रोजी होळीचे औचित्य साधून हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रीय चेतना गॅझेट प्रसिद्ध करुन, उन्नतचेतनेने समाजाचा सर्वांगीन विकास साधण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

स्वतंत्र्याच्या७४ व्या वर्षात सुद्धा भारतातील ७० टक्के जनता उन्नतचेतनेच्या अभावाखाली वावरत आहे. पाच वर्षांसाठी निवडून द्या आणि सत्ताधार्‍यांचा तमाशा पहा, असा सर्रास कार्यक्रम महाराष्ट्रासह देशभर सुरु आहे. मागील वर्षी कोरोना संक्रमणाच्या हाहाकाराने अनेकांचे बळी गेले. तर अनेकांचा रोजगार हिरावला गेला. जानेवारी २०२१ मध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर लग्नासारख्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करणे, मास्कचा वापर टाळणे, फिजीकल डिस्टन्ससह नियमांचे पालन न केल्याने कोरोना महामारीने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. संपुर्ण राज्यात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना पुन्हा एकदा टाळेबंदी झाल्यास अर्थव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे. लोक सारासार विवेक सोडून वागल्याने कोरोनाचे संक्रमण वाढल्याचे संघटनांच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.  

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अनेक धनदांडग्या लोकप्रतिनिधीनी मतकोंबाड, जातीमंडूक प्रवृत्तीने मत खरेदी करुन निवडून आले. ७०टक्के नागरिकांमध्ये उन्नतचेतनेचा अभाव असल्याने ते अमिषाला बळी पडले. देशातील बेकारी, गरिबी, झोपडपट्टया, भ्रष्टाचार, दप्तर दिरंगाई, अनागोंदी, महिलांवरील अत्याचार, लोकप्रतिनिधींचा बेजबाबदारपणा याला उन्नतचेतनेचा अभाव कारणीभूत आहे. यामुळे देश हा प्रगती करु शकत नाही. समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी शिक्षणाबरोबर सुंस्कृत नागरिक घडणे अत्यावश्यक असून, हे उन्नतचेतने शिवय शक्य नाही. म्हणून संघटनांच्या वतीने उन्नतचेतनेचा विकास साधण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे म्हंटले आहे. यासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, ओम कदम, अशोक सब्बन, अंबिका नागुल, शाहीर कान्हू सुंबे, हिराबाई ग्यानप्पा, पोपट भोसले, अशोक भोसले, जालिंदर बोरुडे आदी प्रयत्नशील आहेत. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments