भाजपचे माजी मंत्र्याच्या मेव्हण्याच्या प्रताप

भाजपचे माजी  मंत्र्याच्या  मेव्हण्याच्या प्रताप 

 नितीन भुतारे : आर टी ई कायद्या अंतर्गत बोगस, बनावट दाखल्याच्या आधारे पाल्याचा मोफत प्रवेश घेऊन शासनाची केली फसवणुक

वेब टीम नगर : सन २०१६-२०१७ अंतर्गत आर टी ई  कायद्यानुसार या शैक्षणिक वर्षात जिल्हयातील भाजपचे माजी  मंत्र्याच्या मेव्हण्याने आपल्या मुलाचा प्रवेश तक्षासिला स्कुल अहमदनगर येथे मोफत घेतला आहे. आर टी ई कायदा नुसार खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के  वंचित घटक तसेच आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न एक लाखा पेक्षा कमी आहे त्याच पाल्याला आर टी ई कायद्यानुसार प्रवेश देता येतो. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीन शिक्षण मंत्री यांना ईमेल द्वारे निवेदन पाठाऊन भाजपचे माजी  मंत्र्याच्या मेव्हण्याच्या प्रताप उघडकीस आणला आहे. या निवेदनात सदर पाल्याच्या वडिलांनी बोगस ,बनावट उत्पन्नाचा दाखला बनवून सन २०१६-२०१७ या वर्षात आपल्या पाल्याचे तक्षशिला स्कूल मध्ये प्रवेश घेतला.

सदर व्यक्ती हा भाजपाचे माजी मंत्र्याचा मेव्हणा असल्याचे संपुर्ण जिल्यात तो परिचित आहे. पालकांकडे लाखो रुपयांचे वार्षिक उत्पन्न असुन अहमदनगर जिल्हयातील भाजपचे माजी मंत्र्याच्या मेव्हण्याची बायको या बीड जिल्हयातील आष्टी तालुक्यातील पंचायत समिती मध्ये शिक्षण विस्तार अधिकारी आहे. या संबंधीचे सर्व पुरावे हे शिक्षण मंत्री यांना पाठविले असून सत्तेत असतांना गोरगरीब, वंचित घटक, व आर्थिक दुर्बल घटकातील मुलांच्या आरक्षणावर सुध्दा डल्ला मारण्याचे काम असे लोक करत असतील तर या मंत्र्यांना आरक्षण मागुन तरी काय उपयोग या सर्व प्रकरणाचा खुलासा भारतीय जनता पार्टीने करावा अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे.

 शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठवून  आपण लवकरात लवकर कारवाई करावी तसेच अहमदनगर जिल्हयातील आर टी ई अंतर्गत झालेल्या आत्ता पर्यंत च्या सर्व प्रवेशांची चौकशी करावी तसेच या व्यक्तीला चुकीचा बनावट उत्पन्नाचा दाखला करुन  देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर सुध्दा कारवाई करावी त्यामूळे असे सर्व शासनाची फसवणुक केल्याची अनेक प्रकरणे बाहेर येतील. अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments