प्रियकराचे लग्न ठरल्याने प्रेयसीने त्याच्या अंगावर ॲसिड फेकले

प्रियकराचे लग्न ठरल्याने प्रेयसीने त्याच्या अंगावर ॲसिड फेकले 

प्रियकराचा मृत्यु ,प्रेयसीवर उपचार सुरू 

वेब टीम आग्रा :  आग्रा येथील हरीपर्वत परिसरात एका महिलेने पंखा दुरुस्त करण्याच्या बहाण्याने प्रियकराला घरी बोलावले आणि त्याच्यावर ॲसिड फेकले. तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात महिलाही होरपळली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही 'लिव्ह-इन'मध्ये राहात होते. तरुणाचे अन्य ठिकाणी लग्न ठरल्यावर प्रेयसी चिडली आणि तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

मिळालेल्या माहितीनुसार, हरीपर्वत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री नगरमध्ये एका घरातून सकाळी सात वाजताच्या सुमारास तरुणाच्या किंचाळण्याचा आवाज आला. ते ऐकून आजूबाजूच्या लोकांनी धाव घेतली. त्यावेळी तरुण अॅसिड हल्ल्याने गंभीररित्या होरपळला होता. तर महिलाही जखमी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही पोहोचले. त्यांनी तरुणाला रुग्णालयात नेले. जबाब नोंदवल्यानंतर काही वेळाने तरुणाचा मृत्यू झाला.

मयत झालेल्या तरुणाचे नाव देवेंद्र असे आहे.  तो मूळचा कासगंजचा रहिवासी आहे. तो आग्रा येथील सिकंदरा परिसरात राहत होता. हरीपर्वत परिसरात एका लॅबमध्ये सहायक या पदावर काम करत होता.  पोलिसांच्या माहितीनुसार, महिला गेल्या अनेक वर्षांपासून पतीपासून वेगळी राहात आहे. ती येथे आपल्या दोन मुलांसह राहते. देवेंद्र आणि या महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. ते दोघे लिव्ह इनमध्ये राहतात. त्याचवेळी देवेंद्रच्या कुटुंबियांनी त्याचे लग्न अन्य एका मुलीसोबत ठरवले. तोही लग्नाला तयार झाला होता. त्यामुळे महिला प्रचंड नाराज झाली होती. तिने पंखा दुरुस्त करण्यासाठी त्याला बोलावून घेतले. त्याच्या अंगावर ॲसिड फेकले. यात गंभीर होरपळल्याने रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्याचा मृत्यू झाला. महिलेच्या हाताला जखमा झाल्या आहेत. तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Post a Comment

0 Comments