बाळ बोठेचा गुरुवार पर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम
वेब टीम नगर : रेखा जर हत्या कांडातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याची पोलीस कोठडी ची मुदत आज संपत असल्याने त्याला आज दुपारी पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून बाळ बोठेला पुन्हा २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाळ बोठे यास आज दुपारी पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी पोलिसांच्या वतीने बाजू मांडतांना गुन्हा घडल्यापासून आरोपी नगर शहरात कोठे कोठे होता तसेच बाळ बोठे याला नगर येथून हैदराबाद येथे जाण्यासाठी कोणी कोणी कश्या प्रकारे मदत केली तसेच आरोपीने या घटने बाबत अजून कोणाला सुपारी दिली होती का दिली असेल तर त्याबद्दल तपास करण्यासाठी आरोपी हैद्राबाद येथे असतांना फरार आरोपी नंबर ८. पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ने कशी व कोणत्या प्रकारे मदत केली तसेच आरोपीचा आय फोन उघडण्यासाठी पथक बोलविले असल्याने आरोपीकडून आर्वजून माहिती मिळवायची असल्याचे युक्तिवादात मांडण्यात आले.
तर आरोपीच्या वतीने आजपर्यंत आरोपी पोलिसांच्याच ताब्यात असल्याने आरोपीने पोलिसांना वेळोवेळी पुरेसा वेळ दिलेला आहे. गेल्या १२ दिवसांमध्ये आरोपीने पोलिसांना त्याच्याकडे असलेली सर्व माहिती दिलेली आहे. फरारी आरोपी नंबर ८. हिला अटक झाल्यानंतरच तिने आरोपीस कश्याप्रकारे मदत केली आहे ते समजणार आहे. असा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने बाळ बोठेला गुरुवार पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले
0 Comments