शहरात आतापर्यंत १९ कंटेन्मेन्ट झोन

 शहरात आतापर्यंत १९ कंटेन्मेन्ट झोन 

वेब टीम नगर : अहमदनगर शहरात आणखी चार सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची घोषणा करण्यात आलीय. शहरात आतापर्यंत १९ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा वाढतोय की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

बालिकाश्रम राेडवरील वसंत विहार बिल्डिंग, शहर गावठाण भागातील नागंरे गल्ली परिसर, सावेडीतील सावली साेसायटी आणि आगरकर मळ्यातील समर्थ काॅलनीमध्ये अशाेक जैन ते प्रल्हाद जाेशी घर ते गाेसावी यांच्या घरापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र राहणार आहे.याठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन सेवेसह वाहतुकीला दि. १ एप्रिलपर्यंत प्रतिबंध राहणार आहे.

बालिकाश्रम राेडलगत असलेल्या वसाहतींमध्ये काेराेना संसर्गाचा वेग वाढला आहे.येथे आतापर्यंत चार ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर झाले आहेत. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी मनपाचे उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत राहणार आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेसाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. रहदारीसाठी खुल्या असलेल्या मार्गावर येणाऱ्या-जाणार्‍यांची तपासणी केली जाणार आहे.प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक वस्तू महापालिकेतर्फे पुरवल्या जाणार आहेत. त्यासाठी यंत्रणा उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकिंग सुविधा संबंधित बँक व्यवस्थापनातर्फे पुरवल्या जातील. प्रतिबंधित क्षेत्राला पोलीस बंदोबस्त राहणार असून यासंदर्भात पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता, या भागातील रहदारी आणि वाहने वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यावर संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments