बाळ बोठेच्या अपसंपदेची उघड चौकशी करा : ॲड. सुरेश लगड

 बाळ बोठेच्या अपसंपदेची उघड चौकशी करा : ॲड. सुरेश लगड 

 वेब टीम नगर : नगर येथील बहुचर्चीत रेखा जरे हत्याकांडमधील मुख्य सुत्रधार बाळ जगत्राथ बोठे याच्याकडे असलेल्या अपसंपदेची आपल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने उघड चौकशी करावी'' अशी मागणी पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग  यांच्याकडे ॲड. सुरेश लगड यांनी जनहितार्थ केली  आहे.

यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडात मुख्य सुत्रधार म्हणून अहमदनगर येथील दैनिक सकाळ या वृत्तपत्राचा अहमदनगर आवृत्तीचा कार्यकारी संपादक बाळ जगन्नाथ बोठे यांस अहमदनगरच्या आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठया शिताफीने अटक करुन पोलिस कस्टडी रिमांड घेतली आहे. या बोठेचे नाव पोलिस तपासात निष्पन्न होऊन जवळ पास ९० दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊनही हा महाशय फरार झाल्याने तो पोलिसांना सापडत नव्हता. आता अथक प्रयासानंतर तो पोलिसांना सापडला अशा परिस्थितीत त्याची आपल्या अधिपत्याखाली लाचलुचपत प्रत्रिबंधक खात्यामार्फत उघड चौकडी होणे आवश्‍यक झाले आहे.

या मुख्य सूत्रधाराची समजलेली माहिती अशी की, याने अगदी सुरुवातीस प्रेस फोटोग्राफर म्हणून वेगवेगळया वर्तमानपत्रात काम केलेले होते. तदनंतर बातमीदार म्हणून काम केलेले होते, त्यानंतर दैनिक सकाळ या वर्तमानपत्रात सहाय्यक बातमीदार म्हणून, त्यानंतर मुख्य बातमीदार म्हणून, त्यानंतर निवासी संपादक व शेवटी कार्यकारी संपादक म्हणून दै.सकाळ अहमदनगरमध्ये काम केलेले आहे. एक प्रेस फोटोग्राफर  म्हणून  सुरवात केलेल्या या व्वक्तीने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत पत्रकारीता क्षेत्रात वेगवेगळ्या पदावर काम आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत हा बाळ झटपट (आर्थिक दृष्टया ) इतका मोठा झाला की विचारता सोय नाही, या बाळ बोठेची सुरुवातीची आर्थिक परिस्थिती काय होती व आताची आर्थिक परिस्थिती काय आहे? याची सखोल चौकशी आपल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केली तर अनेक धक्कादायक बाबी उघड होतील. 

त्याचे उत्पन्न व त्याच्याकडे असलेली ज्ञात, अज्ञात, जंगम मिळकत, कॅश रक्काम याची बारकाईने चौकशी केली तर पत्रकारीता क्षेत्रातील हि  व्यक्ती इतकी  झटपट श्रीमंत कसा होऊ शकते? व त्वास भरीव असे उत्पन्नाचे कोणते साधन होते की एवढी प्रचंड माया गोळा करु शकला? तसेच अनेक संस्थांमध्ये स्लिपिंग पार्टनर, पुण्याच्या काही हॉस्पीटलमध्ये पार्टनर, एल ऑण्ड टी क्लब सावेडी अहमदनगर जवळ १५ एकर क्षेत्र, भिस्तबाग, अहमदनगर जवळ ७ एकरचा मोठा प्लॉट व भिंगार येथे ५ एकरची जागा अशी एवढी ज्ञात संपत्ती असल्याचे समजले व या व्यतिरिक्त काही अज्ञात संपत्ती असेल त्याची संपूर्ण चौकशी आपल्या अधिपत्याखारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने करणे आवश्‍यक आहे. 

पोलिसांनी त्याचे विविध बँका व संस्थेवर आर्थिक व्यवहार करण्यास टाच आणलेली असतांना त्यास त्याचे खात्यावरून पैसे काढता येत नाही त्यामुळे त्याच्याकडे खर्चासाठी फरार काळात दररोज जे पैसे होते ते आले कोठून? व त्याची हि बेहिशोबी मालमत्ता, कॅश सर्व बाबीची जनहितार्थ चौकशी झाली पाहिजे. कारण तीन महिने ही व्यकती फरार कशी राहू शकते ? सध्या बोठे यांस दै.सकाळ या वर्तमानपत्राचा पगार नाही मग त्यास पैसे आले  कुठून? आज ही व्यक्ती जो खर्च करते तो कुठून आणतो? सकाळ वर्तमानपत्राचा  पगार नाही,  मग त्यास पैसे आले कोठून ? 

बाळ जगन्नाथ बोठे याचा पत्रकारितेतील प्रवास त्र्याला त्याला तेथे  मिळत असलेलं उत्पन्न , त्याच्याकडे  असलेली संपत्ती , बेहिशोबी मालमत्ता याचा तुलनात्मक  अभ्यास करून त्याची बेहिशोबी मालमत्ता जप्त करावी  तसेच  संस्थांमध्ये तो छुपा भागीदार (स्लीपिंग पार्टनर) असल्याचे समजते त्याची  चौकशी करावी. 

Post a Comment

0 Comments