भिंगार काँग्रेस अध्यक्ष ॲड.आर.आर.पिल्ले यांचे दुःखद निधन

 भिंगार काँग्रेस अध्यक्ष ॲड.आर.आर.पिल्ले यांचे दुःखद निधनवेब टीम नगर : अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी व्हाईस प्रेसिडेंट भिंगार शहर काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष नोटरी ॲड.आर.आर. पिल्ले यांचे गुरुवारी दिनांक १८ रोजी सायंकाळी ५.३० दरम्यान निधन झाले. ते गेल्या ६ मार्च पासून नियमोनिया च्या आजाराने साईदीप हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले मृत्यूसमयी त्यांचे वय ६२ होते. स्वातंत्र्यसैनिक रत्नम पिल्ले यांचे ते कनिष्ठ चिरंजीव होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रातील नागरिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील वकील, समाज बांधव उपस्थित होते.  

स्व.पिल्ले विद्यार्थिदशेपासून ते अखेरपर्यंत काँग्रेस पक्षात होते.प्रारंभी भिंगार शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी व नंतर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस तर विद्यमान अध्यक्ष होते.विद्यमान अध्यक्ष भिंगार कॅंटोन्मेंट बोर्डाचे सलग ३ वेळा उपाध्यक्ष पद त्यांनी भूषविले. 

 भिंगार शहराच्या विकासासाठी त्यांनी या काळात अनेक प्रश्न मार्गी लावले. आज पर्यंत ते भिंगारच्या  विकासासाठी झटत होते. नगर शहरासह जिल्ह्यात  त्यांचा मित्रपरिवार आहे. त्यांच्या निधनाने एक सच्च्या काँग्रेस प्रेमी व सामाजिक कार्यकर्ता हरपल्याची प्रतिक्रिया अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना व्यक्त केली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, ज्येष्ठ बंधू व दोन भगिनी असा परिवार आहे. 


Post a Comment

0 Comments