नगरटुडे बुलेटिन 17-03-2021
नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुजित जगताप यांची निवड
वेब टीम नगर : विळद येथील सुजित जगताप यांची नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मान्यतेने विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर यांनी जगताप यांना नियुक्तीचे पत्र देत त्यांची निवड जाहीर केली आहे.
सुजित जगताप न्यू आर्टस् महाविद्यालयाचे पदवीचे विद्यार्थी असून ते विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत आहेत. आजवर त्यांनी विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यांच्यामध्ये त्यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
सुजित जगताप निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, पक्षाने माझ्यावरती विश्वास टाकून मला अध्यक्षपदी काम करण्याच्या दिलेल्या संधीचा मी विद्यार्थी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी उपयोग करणार आहे. नगर तालुक्यातील अनेक विद्यार्थी तालुक्यातील वेग वेगळ्या महाविद्यालयांमध्ये तसेच नगर शहरामध्ये शिक्षणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने येत असतात. त्यांचे अनेक प्रश्न असतात. ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा हक्काचा आवाज होण्यासाठी विद्यार्थी काँग्रेस काम करेल.
जगताप यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ.डॉ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवक - विद्यार्थी काँग्रेस जिल्हा समन्वयक तथा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, कार्याध्यक्ष राहुल उगले, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, सोमेश्वर दिवटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, नगर तालुका काँग्रेस अध्यक्ष संपतराव मस्के, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट आदींनी अभिनंदन केले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अविनाश घुले पदाच्या माध्यमातून विकास कामांना चालना देतील - अशोकराव बाबर
वेब टीम नगर : घुले परिवाराने नेहमीच सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. स्व.शंकरराव घुले यांच्यानंतर अविनाश घुले यांनी त्यांचे हेच कार्य समर्थपणे सुरु ठेवले आहे. हमाल पंचायत, नगरसेवक, प्रतिष्ठान, मंडळे यांच्या माध्यमातून त्यांचे समाजसेवेचे व्रत सुरु आहे. अनेकांची कामे करत असतांना त्यांनी मोठा मित्र परिवार निर्माण केला आहे. त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना विविध पदे मिळत आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या माध्यमातून ते नगरमध्ये चांगले प्रकल्प आणुन विकास कामांना चालना देतील, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सदस्य अशोकराव बाबर यांनी केले.
स्थायी समितीच्या सभापतीपदी अविनाश घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रयत शिक्षण संस्थेचे सदस्य अशोकराव बाबर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अंबादास बाबर, प्रा.कैलास मोहिते, भाऊसाहेब पांडूळे, नाथाजी राऊत, रामचंद्र दिघे, रंगनाथ खेंडगे, सुरेश कावळे, गोविंद सांगळे, बाबासाहेब काळे, शाकिर शेख, उबेद शेख, मधुकर केकाण सुरेश पठारे आदि उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना अविनाश घुले म्हणाले, ज्येष्ठांचे आशिर्वाद आणि मित्र परिवारांच्या सहकार्याने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. या माध्यमातून विविध पदेही मिळत आहेत, परंतु हे पद मिरविण्यासाठी नसून त्या माध्यमातून कामे झाली पाहिजे, ही आपला भावना आहे. स्थायी समिती ही शहर विकासात योगदान देणारी असणारी असून, त्या माध्यमातून शहरात चांगली कामे होण्यासाठी प्रयत्नशिल राहू, असे सांगून सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी प्रा.कैलास मोहिते, भाऊसाहेब पांडूळे यांनी अविनाश घुले यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शेवटी रामचंद्र दिघे यांनी आभार मानले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मेहेर कॉलनी स्टेशन रोड येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ
प्रभागातील नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील : सुरेखा कदम
वेब टीम नगर : शहरातील प्रत्येक प्रभागात चांगली कामे झाली पाहिजे, त्याचबरोबर शहरात मोठे प्रकल्प आले पाहिजे, त्या माध्यमातून शहराचा विकास होईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व एक विकसित शहर निर्माण होईल. याच दृष्टीकोनातून आपण महापौर असतांना प्रयत्न केले. अनेक कामे झाली, अनेक मंजुरी मिळाली. त्यावेळी केलेली कामे आता दृष्टीपथात येऊ लागली आहे. आताही प्रभागातील विकास कामांबाबत जागरुक राहून नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. अशीच विकास कामे यापुढील काळातही होत राहतील. नागरिकांनीही आपल्या भागातील कामांसाठी आग्रही राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम यांनी केले.
प्रभाग क्र.१२मधील मेहेर कॉलनी स्टेशन रोड येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ माजी महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे, अनिल गुगळे, अभय गुगळे, आशिष मुथा, वसंत गांधी, पारस धोका, फिरोज दमानिया, रतन कोठारी, ओंकार पाचपुते, हर्षल गुगळे, अजय मुथा, सुर्यकांत धोका, कल्पना धोका, आशा गायकवाड, चंद्रकला धोका, अजय लुंकड, श्रद्धा गुगळे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी नगरसेवक दत्ता कावरे म्हणाले, नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आपण प्राधान्य दिले आहेत. चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून प्रत्येक भागात कामे होत आहेत. नागरिकांना सोयी-सुविधा मिळाव्यात याकडे आपण कायम लक्ष देत आहोत. या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागली आहेत, उर्वरित कामे पुढील काळातील असे सांगितले.
यावेळी संभाजी कदम म्हणाले, नागरिकांची समस्या सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे. त्याचबरोबर प्रभागाचा सर्वांगिण विकास कसा होईल, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुचनांचा आदर करुन त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. प्रभागातील नगरसेवक हे चांगले काम करत असल्याने हा प्रभाग नक्कीच आदर्श ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी अनिल गुगळे, वसंत गांधी आदिंनी मनोगत व्यक्त करतांना नगरसेवकांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. सुत्रसंचालन अभय गुगळे यांनी केले. पारस धोका यांनी आभार मानले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नगर शहर विकासासाठी तरुणांच्या मागे उभा राहणार
बाबुशेठ टायरवाले : प्रभाग 2 मधील वीर सावरकर मार्ग ते जयहिंद चौक रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ
वेब टीम नगर : अहमदनगर शहराचे तत्कालीन अपक्ष आमदार स्व.नवनीतभाई बार्शीकर यांनी शहर विकासाचा पाया रोवला आता तरुण आमदार संग्राम जगताप यांनी कळस उभारणीचे काम हाती घेतले आहे. प्रभागातील तरुण-तडफदार नगरसेवकांची कामे जोरात सुरु आहे. नगर शहर व प्रभागाच्या विकासासाठी या तरुणांच्या मागे उभा राहणार, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते बाबूशेठ टायरवाले यांनी केले.
प्रभाग क्र.२ मधील वीर सावरकर मार्ग ते जयहिंद चौक पर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ टायरवाले यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आ.संग्राम जगताप, नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, देवदत्त पाउलबुधे, आर.बी.रक्ताटे, एस.एल.तांबे, रत्नाकर बडे, राजू नायर, यशवंत तवले, रविंद्र पाखले, अर्जुन आठरे, महेश रासकर आदि मान्यवर उपस्थित होते.
टायरवाले पुढे म्हणाले, नगर शहर हे एक खेडेगाव आहे, असे आजही संबोधले जाते, पण शहराला आता तरुण नेतृत्व लाभले. प्रभागामध्ये तरुण नगरसेवक निवडून दिले. सध्या यंग जनरेशन आहे, त्यामुळे शहर विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. यासर्व तरुणांच्या मागे पाठबळ देण्याचे काम आम्ही करु, असे म्हणाले.
प्रास्तविकात निखिल वारे म्हणाले, शहरातील एकूण १७प्रभागामध्ये प्रभाग २ हा खूप मोठा असूनही आम्ही चारही नगरसेवक आ.जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खूप कामे मंजूर करुन घेतली. ड्रेनेज, रस्ते, पाणी प्रश्न ही कामे प्रभागात सुरु आहेत. नागरीकांचे सहकार्य, आ.जगताप यांचे योगदान त्यामुळे प्रभागातील प्रश्न सोडवून विकासाला गती मिळाली, असे ते म्हणाले.
आ.संग्राम जगताप म्हणाले, प्रभाग दोन मधील चारही नगरसेवक कर्तव्यदक्ष, कार्यक्षम असून, छोटी-छोटी कामे देखील कशी पूर्ण होतील, याकडे ते बारकाईने लक्ष देत आहेत. त्यामुळे या भागातील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले.
नगरसेविका रुपालीताई वारे, संध्याताई पवार, नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी नागरिकांनी आ.संग्राम जगताप व चारही नगरसेवकांच्या कामांबद्दल समाधान व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी स्नेहल कुलकर्णी, शेखर डोक्रस, रविंद्र राऊत, दिपक रेखी, रवि वारे, सचिन गाडे, सचिन लोटके, बिभिषण अनभुले, रविंद्र पहिलवान, सुधाकर देशपांडे, शुभदा कस्तुरे, स्तिमा नायर, अलका म्हसे, शरयू तवले, अनुराधा होशिंग, स्मिता कामबलत, निलांबरी मोडक आदिंसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कुराणच्या आयतबद्दल चुकीचे वक्तव्य करुन, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार्या
रिजवीचा अहमदनगर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध
धार्मिक भावना दुखावून व देशाची शांतता भंग केल्याप्रकरणी रिजवीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
वेब टीम नगर : ईस्लाम धर्मातील पवित्र धर्मग्रंथ कुराण मधील २६ आयत हटविण्याचे आक्षेपार्ह वक्तव्य करुन, सदर मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारा वसीम रिजवी याच्यावर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी व देशाची शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिजवी याच्या कृत्याचा जाहीर निषेध नोंदवून, सदर मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी (महसुल) उर्मिला पाटील यांना देण्यात आले. यावेळी मन्सूर शेख, मौलाना अब्दुल सलाम, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, मुफ्ती अल्ताफ, डॉ.रिजवान अहमद, नगरसेवक समद खान, अज्जू शेख, अल्तमश जरीवाला, फिरोज शेख, अन्सार सय्यद, अकलाख शेख, जुनेद शेख, नवेद शेख, रमीज शेख, जावेद शेख, नईम सरदार, हमजा चुडीवाला, अमीर सय्यद, निसार मास्टर, सरफराज शेख, अॅड.अशफाक सय्यद, वहाब सय्यद, भैय्या बॉक्सर, रिजवान पठाण, रियाज खान, जावेद सय्यद, रमजान कुरेशी, निसार बागवान, फिरोज शफी, सरफराज जहागीरदार, नदिम शेख आदिंसह मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
लखनऊ येथील शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी याने कुराणच्या आयतचा चुकीचा अर्थ काढून, आपल्या अज्ञानपणाचे व मानसिक संतुलन बिघडल्याचे दर्शन घडविले आहे. रिजवी याने कुराण मधील २६ आयत दहशतवादाला उत्तेजना देत असल्याचे चुकीचे आरोप करुन, सदरील आयात कुराण मधून काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. रिजवी याने अपुर्ण अभ्यासाच्या आधारावर कुराणच्या त्या 26 आयत मधील जिहादचा चुकीचा अर्थ लावला असून, मुस्लिम धर्मियांची प्रतिमा मलीन करण्याचे काम त्याने केले आहे. तर जातीयवादी संघटना व राजकीय पक्षांना भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे. लखनऊ येथे झालेल्या मुस्लिम समुदायाच्या संमेलनमध्ये त्याला ईस्लाम धर्मातून बहिष्कृत करण्यात आले असून, रिजवी हा चुकीचा संदेश मोठ्या प्रमाणात पसरवत आहे. संपुर्ण देशात मुस्लिम समाज त्यांच्या विरोधात पेटून उठला असून, हे प्रकरण संयमाने हातळण्याची गरज आहे.
भारतीय संविधानाच्या घटनेने सर्व नागरिकांना धर्म स्वातंत्र्य व त्याचे रक्षण करण्याचा अधिकार दिला असून, कोणत्याही धार्मिक ग्रंथात सर्वोच्च न्यायालय देखील बदल करु शकत नाही. असे असताना देखील रिजवी याने कुराणबद्दल चुकीचा संदेश पसरवून जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायलयाने देखील त्याची याचिका रद्द करावी, रिजवी यांनी देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावून देशात शांतता व कायदा सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
थेंब, थेंब पाणी बचतीमधून जलक्रांती होणार
कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर : अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ
वेब टीम नगर : थेंब, थेंब पाणी बचतीमधून जलक्रांती होणार आहे. पाणे हेच जीवन आहे. भरपूर पाणी असले तरी त्याचा दुरोपयोग होता कामा नये. पुढच्या पिढ्यांचा विचार करुन पाणी बचत व योग्य नियोजन ही काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी. नान्नोर यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने सुरु असलेल्या जलजागृती सप्ताहतंर्गत अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जलजागृती सप्ताहाचा शुभारंभ कार्यकारी अभियंता नान्नोर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपकार्यकारी अभियंता सुनिल जगताप, उपअभियंता विकास शिंदे, शाखा अभियंता जे.जी. देशमुख, अभियंता कोल्हे, स्थापत्य अभियंता राणा, पुनम बनकर, जालिंदर बोरुडे, उमेश डावखर, जालिंदर तोडमल, वैशाली बोडखे, सोमनाथ पोटे, शिल्पा ताजणे, राजेश जाधव, जालिंदर गोरे, गणेश कवडे आदिंसह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलता कार्यकारी अभियंता नान्नोर म्हणाले की, पाणी बचत स्वत:पासून सुरु झाली पाहिजे. सरकारपेक्षा सर्वसामान्यांनी जल बचतसाठी पुढाकार घेतल्यास ही चळवळ यशस्वी होणार आहे. जल प्रदुषण थांबविण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. शाश्वत विकास जल बचतीवर अवलंबून असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक उप कार्यकारी अभियंता सुनिल जगताप यांनी अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या वतीने दि.१६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पाणी बचत, योग्य वापर व नियोजनाची माहिती देऊन जागृती केली जाणार असल्याचे सांगितले. तसेच यावेळी उपस्थितांना जल बचतची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश डावखर यांनी केले. आभार जालिंदर बोरुडे यांनी मानले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
0 Comments