माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे निधन

 माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे निधन 

वेब टीम नगर : माजी केंद्रीय जहाज बांधणी मंत्री, माजी  खासदार दिलीप गांधी यांचं कोरोनाच्या आजाराने दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात पहाटे ३ च्या दरम्यान निधन झाले. मृत्यू समयी त्यांचं वय ६९ वर्षांचं होत. 

भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत अडचणीच्या काळात त्यांनी नगर जिल्ह्यात पक्ष बांधणी नगरसेवक पदापासून उप नगराध्यक्ष ते थेट ३ वेळा खासदार आणि केंद्रात मंत्रिपद या व्यतिरिक्त १०८ वर्षाची परंपरा असलेली नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. नगर दक्षिण मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतांना त्यांनी नगर चा उड्डाणपूल नगर - पुणे रेल्वे शटल सेवा आदी समस्यांना वाचा फोडून चालनाही दिली. त्यांच्या मृत्यू ने सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे. 

त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सरोज गांधी , मुलगा सुवेंद्र, एक कन्या , सून , जावई नातवंड असा परिवार आहे.   


  

Post a Comment

0 Comments