वराती साठी गर्दी केली नवरदेवाचे वडील ,डीजेच्या मालकावर गुन्हा दाखल

वराती साठी गर्दी केली नवरदेवाचे वडील ,डीजेच्या मालकावर गुन्हा दाखल 

वेब टीम नगर : घराच्या मोकळ्या जागेत लग्नाच्या वरातीसाठी गर्दी केली. तसेच साउंड सिस्टिमवर विनामास्क लावून नाचण्यात येऊन जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणा-या नवरदेवाच्या वडिलांवर आणि साउंड सिस्टिम (डिजे) मालकावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील चास शिवारात चास ते अकोळनेर जाणारे रोडवर लक्ष्मण नामदेव कार्ले याचे मुलाचे लग्नाच्या वरातीमध्ये मंगेश अरुण थोरात (रा पाईपलाईन रोड ता.  जि अहमदनगर) याचा साउंड सिस्टिम बुक करून थोरात यांनी टाटा कंपनीची निळ्या रंगाची 709 टेम्पो ( एमएच १६बी  ३३४८) यामध्ये बसविण्यात आलेल्या साउंड सिस्टिमवर गाणे वाजविण्यात येऊन, यावेळी वरतीसाठी आलेले लोक हे विनामास्क गर्दी करून नाचत होते. या दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी कोविड १९ या रोगाचे प्रादुर्भाव संदर्भाने निर्गमित केलेल्या आदेशाचे संबंधितांनी उल्लंघन केले. याबाबत पोकॉ संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून गु र.नं. १२८/२०२१ प्रमाणे भादवि कलम १८८,२६९,२७०मु पो अधिनियम १९५१ चे ३७(१), (३)/१३५ प्रमाणे लक्ष्मण नामदेव कार्ले, मंगेश अरुण थोरात या दोघांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान टाटा कंपनीची निळ्या रंगाची 709 टेम्पो (एमएच १६बी  ३३४८) त्याचे मुळ रचनेत बदल केलेला, हायलेक्स प्रो लाईट कंपनीचे मिक्सर किं, किर्लोस्कर कंपनी चे जनरेटर, काळे रंगाचे चार बेस टॉप असा एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Post a Comment

0 Comments