बाळ बोठेकडून चौकशीत अपेक्षीत सहकार्य नाही

 बाळ बोठेकडून चौकशीत अपेक्षीत सहकार्य नाही 

वेब टीम नगर : यशस्वीनी महिलांब्रिगेड च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडामागील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला जेरबंद करून तीन दिवस लोटले. न्यायालयाने  त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर सध्या त्याचा मुक्काम एम आयडीसी पोलीस ठाण्यात असून पोलीस तेथे त्याची चौकशी करीत आहेत. मात्र बाळ बोठे या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत नसल्याचे पुढे आले आहे. 

बाळ बोठे याने रेखा जरे जर जिवंत राहिल्या तर त्या आपल्या विरोधात तक्रारी करतील आणि त्यातून आपली बदनामी होईल या भीतीपोटी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात म्हंटले आहे.मात्र रेखा जरे यांच्या खुनाचा कट कोठे रचला,त्यासाठी किती बैठक झाल्या , किती रुपयांची सुपारी दिली गेली,या गुन्ह्या मध्ये आणखीन आरोपींचा समावेश आहे का ? अश्या अनेक प्रश्नांची उकल उर्वरित ४-५ दिवसात पोलिसांना करावयाची आहे.तसेच गुन्हा घडल्यानंतर बोठेला पसार होण्यात कोणी कोणी मदत केली या सर्व गोष्टींची माहिती काढणे गरजेचे आहे.   

या हत्याकांडाचे  मूळ असलेल्या "हनीट्रॅप"  प्रकरणाचाही शोध घ्यायचं असून बोठे याचा घरून जप्त केलेला आय फोन बोठे कडून उघडून घेणे  आणि त्याची तपासणी करणे आणि त्यातून पुढे आलेल्या मुद्द्यांवर बोठे ला बोलते करण्याचे आव्हान पोलसांसमोर आहे. त्यासाठी तांत्रिक व कसबी रीतीने त्याची चौकशी करावी लागणार आहे.त्यामुळे बोठे या चौकशीला कसे सहकार्य करतो वा पोलीस त्याला कसे उद्युक्त करतात  हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.    

Post a Comment

0 Comments