आरोग्य आहार : चविष्ट पापड रायता
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चविष्ट पापड रायता
साहित्य : २ कप दही फेटलेले, २ भाजलेले मसाले पापड, १/२ चमचा जिरेपूड, १/२ चमचा काळी मिरीपूड, कोथिंबीर, काळेमीठ गरजेप्रमाणे, मीठ.
कृती : पापड रायता बनविण्यासाठी पापड भाजून घ्या. एक मोठ्या पात्रात दही घालून फेटून घ्या. या मध्ये जिरेपूड आणि मीठ घाला. चांगल्या प्रकारे मिसळा. हे फ्रीजमध्ये २ तासासाठी ठेवून द्या. वाढण्या पूर्वी पापड कुस्करून घ्या आणि रायतामध्ये मिसळून द्या.वरून बारीक चिरलेली कोथिंबीर ,काळी मिरपूड ,काळे मीठ घालून सर्व्ह करा.
0 Comments