शहर परिसरात ६ मायक्रो कंटेनमेन्ट झोन
वेब टीम नगर : नगर मधील मायक्रो कंटेनमेन्टची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे शहर परिसरात आज तीन कंटेनमेन्ट झोन वाढल्याने शहरातील मायक्रो कंटेनमेन्टची संख्या सहा झाली आहे आयुक्त शंकर मोरे यांच्या आदेशानुसार शहर परिसरातील बालिकाश्रम रोड परिसरातील सुडके मळा कोहिनूर मंगल कार्यालय परिसरातील जयश्री कॉलनी तर सिव्हिल हडको परिसरातील गणेश चौक या नव्याने झालेल्या कंटेनमेन्ट यामुळे शहरातील कंटेनमेन्ट झोनची संख्या सहावर पोहोचली आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून 28 मार्चच्या मध्य रात्री १२ पर्यंत या परिसरात आयुक्तांच्या आदेशानुसार विविध निर्बंध लागू राहणार आहेत.
0 Comments