स्वयंसिद्धा : बहिरवाडीच्या जीवनज्योती बचत गटाचा 'केक' प्रसिद्धीस येतोय

"स्वयंसिद्धा" 

 बहिरवाडीच्या जीवनज्योती बचत गटाचा 'केक' प्रसिद्धीस येतोय 

बहिरवाडी हे २७७ उंबऱ्याचं छोटंसं गाव .इतर ठिकाणा प्रमाणे यागावातील महिलाही नेटका प्रपंच करून चार पैसे काखोटीला राखून असायच्या . मात्र त्यांच्यातल्याच काही महिलांनी एकत्र येऊन बचत गटाची स्थापना केली  जीवन ज्योती स्वयंसहाय्यता समुह असे  या गटाचे नाव आहे. आपल्या जवळचाच पैसा बचत गटात घालून त्यांनी बचतगटाच्या नावावर कर्ज काढले . त्यातून समूहातील दोन महिलांनी समूहातून अंतर्गत कर्ज घेऊन केक बनवण्याचे ट्रेनिंग घेतले.आणि आता त्या स्वतंत्र उद्योजिका झाल्या आहेत.   शीतल दारकुंडे आणि विजया दारकुंडे असे या महिला उधोजिकांची नावे आहेत . 

 त्यांच्याशी बातचीत करतांना त्या सांगू लागल्या ,अगदी दोन हजार रुपयांपासून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली हळूहळू आम्हाला एक नंतर दोन-तीन असे करून आतापर्यंत दररोज सरासरी एक याप्रमाणे आम्ही मोठे केक तयार करतो . त्यावर आयसिंग करून केक चांगला सजवतो त्यामुळे ग्राहक आमच्या 'केक' वर जाम खूष असतात. आमच्या केकच्या सजावटीमुळे आकर्षक केक ग्रामीण भागात उपलब्ध होऊ लागल्याने .आम्हाला तोंडी प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर मिळू लागली. आजू बाजूच्या गावातील ग्राहकही आता आम्हाला मिळू लागले आहेत . बहिरवाडीचा केक आता प्रसिद्ध होऊ लागला आहे. 

   सुरवातीला केकच्या  ऑर्डर पूर्ण केल्या  त्यातून आम्हाला सहा हजार रुपये इतका नफा झाला.  आता आम्ही इतर दिवशी छोट्या  पेस्ट्री तयार करून आसपासच्या गावातील दुकानांना पुरवितो .  या कामातून त्यांना मानसिक समाधान तर मिळालेच पण बरोबरच आर्थिक लाभही झाला आणि पुढेही होत राहणार  आहे याचं श्रेय उमेद अभियानाला  व उमेद कर्मचारी श्री सगर , तालुका व्यवस्थापक श्री गव्हाणे यांना तसंच सी आर पी ज्योती काळे यांना जातं त्यांनी आम्हाला प्रोत्साहन तर दिलंच ,शिवाय वेळोवेळी त्यांचे  मार्गदर्शनही मला असते. 

Post a Comment

0 Comments