बोठेला २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी

 बोठेला २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी 

वेब टीम पारनेर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला आज पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले.दुपारी १ च्या दरम्यान पोलीस बंदोबस्तात पायी चालत न्यायालयात आणण्यात आले.त्याला पारनेर न्यायालयाने २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यावेळी पोलिसांच्या वतीने बाजू मांडतांना अद्याप बराच तपास करणे बाकी असल्याचे सांगून कुठे कट रचला, किती वाहने वापरली अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायची असल्याने पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने ती मागणी मान्य करून २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान आज सकाळी बाळ बोठेला हातात बेड्या ठोकलेल्या अवस्थेत पायी चालत न्यायालयात आणण्यात आले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील,पोलीस निरीक्षक घनश्याम बळप,विजयकुमार बोत्रे.रेखा जरे यांचा मुलगा रुणाल न्यायालयात उपस्थित होते तर बोठेची पत्नी सविता,मुलं यश व हर्ष आणि काही निवडक नातेवाईक पोलीस ठाण्या बाहेर सकाळ पासून उपस्थित होते.                 

Post a Comment

0 Comments