बोल्हेगाव परिसरातील काही भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहिर
वेब टीम नगर : अहमदनगर महापालिका हद्दीतील बोल्हेगाव भागातील राघवेंद्र स्वामी नगर परिसरातील संध्या जनरल स्टोअर ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संध्या जनरल स्टोअर ते उत्तरेकडील अपार्टमेंटपर्यंत परिसर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी क्षेत्र प्रतिबंधित करण्याचा आदेश आज मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी जारी केला आहे.
मायक्रो कंटेनमेंट झोन क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री सेवा इत्यादी वगळता सर्व दुकाने दि.१३-३-२०२१ रोजी दुपारी दोन वाजल्यापासून २६-३-२०२१ रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
0 Comments