अश्या आवळल्या बाळ बोठेच्या मुसक्या

 अश्या आवळल्या बाळ बोठेच्या मुसक्या  

वेब टीम नगर : गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या बाळ बोठे याच्या मुसक्या आवळण्यात नगरच्या पोलिसांना यश आले असून त्याला आज पहाटे ६ च्या दरम्यान हैदराबाद येथील एका हॉटेल मधून सिनेमा स्टाईल ने मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. 

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाच्या प्रकरणातील बाळ बोठे हा मुख्य सूत्रधार असून गेल्या तीन महिन्यांपासून तो सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी आता पर्यंत जवळपास १०० पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली होती जिल्ह्यात , परजिल्ह्यात , राज्यात , परराज्यातील लुधियाना , भटिंडा , चंदीगड, भोपाळ , छत्तीसगड, आदी ठिकाणी छापेमारी करून बाळ बोठे च्या अटकेसाठी  पोलिसांनी जंग जंग पछाडले होते.बाळ बोठे सारखा आरोपी फरार झाल्याने पोलिसांवरील दबाव वाढत होता तर अनेकदा पोलिसांच्या भूमिकेबद्दलच नागरिकांनी संशय व्यक्त केला होता. या कारवाई दरम्यान पोलीस  आल्याची कुणकुण लागताच बाळ बोठे याने तिथल्या तिथे ३ वेळा पोलिसांना गुंगारा दिला.  

बाळ बोठे हा  हैद्राबाद मध्ये वेषांतर करून राहत होता. तेथील एका हॉटेल मधल्या रुम नंबर १०९ मध्ये बी. जे. बी या नावाने तो राहत होता . या रुम ला पुढून कुलूप लावलेले असून मागच्या दाराने तो ये-जा करत असे. बाळ बोठे सह त्याच्या तीन सहकाऱ्यांनादेखील अटक करण्यात आली आहे.  त्यांचे नावे पुढील प्रमाणे - १) बाळ जगन्नाथ बोठे रा. बालीकाश्रम रोड कमलनयन हॉस्पिटल समोर , २) राजशेखर अजय चाकाली वय २५ रा, गुडुर करीमनगर मुस्ताबाद आंध्रप्रदेश तेलंगणा ३) शेख इस्माईल शेख आली वय 30 वर्षे राहणार खुबा कॉलनी शाईन नगर बालापुर सुरुरनगर रंगारेड्डी आंध्रप्रदेश तेलंगणा, ४)अब्दुल रहमान अब्दुल आरिफ वय 52 वर्षे राहणार चारमिनार मज्जित पहाडी शरीफ सुरूर नगर रंगा रेड्डी हैद्राबाद आंध्रप्रदेश ५) महेश वसंतराव तनपुरे वय 40 वर्षे धंदा व्यवसाय राहणार कुलस्वामिनी गजानन हाउसिंग सोसायटी नवलेनगर गुलमोहर रोड सावेडी अहमदनगर ६) जनार्दन अकुले चंद्रप्पा राहणार 14 -113 फ्लॅट नंबर 301 त्रिवेणी निवास रामनगर पी अँण्ड टी कॉलनी सारोमानगर रंगारेड्डी हैदराबाद तेलंगणा  यांना अटक करण्यात आली असून पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी रा हेंद्राबाद तेलंगणा फरार आहे. महेश वसंत तनपुरे यास नगरमध्येच अटक करण्यात आली असून  पैकी राजशेखर चाकाली शेख इस्माईल शेख आणि  अब्दुल रहमान अब्दुल आरिफ यांना पारनेर न्यायालयात हजार करण्यात आलं असून त्यांना १६ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. नगर क्राईम ब्रांचच्या  पथकाने ५ दिवसांच्या अथक ऑपरेशन करून औरंगाबाद पोलीस हैदराबाद पोलीस कमिश्नर यांच्या मदतीने आणि शेवटचे २४ तास तर न झोपता कारवाई करून या आरोपींना अटक करण्यात आली या मध्ये सोलापूर मुंबई क्राईम ब्रांच सायबर टेक्निकल अनालिसिस च्या आधारे केलेल्या विशलेषणामुळे या कारवाईला यश आले. 

या कारवाईत पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील नगर ग्रामीण विभागाचे अनिल कटके , कर्जत पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक यादव , संभाजी गायकवाड, महिला पोलीस निरीक्षक गडकरी , सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप , मिथुन घुगे , दिवटे, समाधान सोळंखे , पो हे कॉ रवींद्र पांडे , पोना रविकिरण सोनटक्के , दीपक शिंदे , राहुल गुंडू , अभिजित अरकल, महिला पोना जयश्री फुंदे , पोना संतोष लोंढे , गणेश धुमाळ , भुजंग बडे, पोकॉ  सचिन वीर , सत्यम शिंदे , चौघुले, मिसाळ , सानप , रणजित जाधव , बुगे , जाधव , चापोकॉ जाधव , दातीर , पोकॉ प्रकाश वाघ चापोना  राहुल डोळसे , चापोकॉ रितेश वेताळ, आदींनी हि कारवाई केली.            

Post a Comment

0 Comments