सचिन वाझे यांच्यावर दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रश्नांची सरबत्ती

सचिन वाझे यांच्यावर  दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रश्नांची सरबत्ती   

वेब टीम मुंबई : मनसुख हिरन यांचा मृत्यू व त्यांच्या स्कॉर्पिओ कारशी संबंधित अनेक प्रश्न एटीएसकडून वाझे यांना विचारण्यात आले. याबाबत एटीएसमधील एका अधिकाऱ्याने एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर ज्या स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती ती कार मनसुख हिरन यांची होती. याप्रकरणात सुरुवातीला मुंबई क्राइम ब्रांच मार्फत तपास करण्यात येत होता. त्या तपास पथकात सचिन वाझे होते. दरम्यान, मनसुख हिरन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या मुंब्रा रेतीबंदर येथील खाडीत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर राज्याच्या विधीमंडळात यावरून तीव्र पडसाद उमटले. विरोधी पक्षाने थेट सचिन वाझे यांचे नाव घेत आरोप केले. मनसुख यांची पत्नी विमला हिरन यांच्या जबाबाचा आधार घेत मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणामागे सचिन वाझे यांचा हात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. वाझे यांना निलंबित करून अटक करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र सरकारकडून ही मागणी फेटाळण्यात आली. मनसुख हिरन मृत्यूचा तपास एटीएस कडे सोपवण्यात आला व पाठोपाठ वाझे यांची क्राइम ब्रांचमधून लोकल आर्मरी युनिटमध्ये बदली करण्यात आली.



Post a Comment

0 Comments