मुलींनी सक्षम होऊन स्वत:चे संरक्षण करण्याची आवश्यकता

 मुलींनी सक्षम होऊन स्वत:चे संरक्षण करण्याची आवश्यकता 

 डॉ.यामिनी कर्‍हाडकर : महिला दिनी शिशु संगोपन संस्थेस वी अस अन् आवर फौंडेशनच्यावतीने सॅनिटरी पॅड मशिन

     वेब टीम नगर : एके काळी स्त्रियांना घरातून बाहेर जाण्याची मुभा नव्हती. त्यामुळे शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे ही गोष्ट तर दूरच महात्मा ज्योतिबा फुले-सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षण मिळावे, म्हणून खूप संघर्ष केला व मुलींसाठी पहिली शाळा काढली. मुलींनी सक्षम होऊन स्वत:चे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. याच बरोबर  मुलींनी व पालकांनीही आरोग्याबाबत काळजी घेतली पाहिजे. मुलींमध्ये प्रत्येक वयात वेगवेगळे बदल होत असल्याने भावनिकेतेने त्यांच्याशी संवाद साधून त्यांना समजावून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.यामिनी कर्‍हाडकर यांनी केले.


     जागतिक महिला दिनानिमित्त शिशु संगोपन संस्थेच्या श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाचे दिपप्रज्वलनाने उद्घाटन डॉ.सुस्मिता ठाकूर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डॉ.प्राजक्ता सावेडकर, डॉ.यामिनी कर्‍हाडकर,  संस्थेचे सचिव र.धों.कासवा, प्राचार्या कांचन गावडे, मुख्याध्यापिका योगिता गांधी आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी डॉ.सुस्मिता ठाकूर म्हणाल्या, आजची स्त्री कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर यशाच्या शिखरावर आहे, हे यशाचे शिखर गाठण्यास तिला शैक्षणिक आर्थिक सामाजिक इत्यादी चौफेर मार्गांनी जावे लागले, त्यामुळेच आज समाजातही स्त्रिया ताठ मानेने जगू शकतात. सध्या स्त्रिया नोकरी आणि इतरही क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. त्यामुळे मुलींनी चांगले शिक्षण घेऊन समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करावे, असे आवाहन केले.

     यावेळी डॉ.प्राजक्ता सावेडकर यांनी वी अस अन् आवर फौंडेशनच्यावतीने शिक्षणाचा व तंत्रज्ञानाचा उपयोग करुन समाजातील दुर्बल घटकांसाठी संस्था विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असते. पर्यावरण, आरोग्य व मुलींच्या आरोग्यांसाठी काम करत असून, त्यासाठी आवश्यक ते साधने शाळांना देत असल्याचे सांगितले.

     याप्रसंगी र.धों.कासवा म्हणाले, ‘शिकलेली आई घराला पुढे नेई’ या उक्तीप्रमाणे स्त्रियांना जोपर्यंत समान वागणूक समान शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत समाज सुधारणा होणार नाही. त्यामुळे मुलींना चांगले शिक्षण देऊन त्यांना उच्चशिक्षित केले पाहिजे. संस्थेच्यावतीने मुलींना शिक्षणाबरोबरच विविध स्पर्धा परिक्षांसाठी प्रोत्साहित केले जाते. त्यांचबरोबर त्यांची आरोग्याची काळजीही घेतली जाते.

     वी अस अन् आवर फौंडेशनच्यावतीने शाळेत सॅनिटरी पॅड मशिन बसविण्यात आले. त्याचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ.रेवती नगरकर, स्वामीनी थोरात, पुनम कोळपे, सायली ढमाळ, करिश्मा कोठारी-जोशी, श्रेयास लुणिया, प्रतिक वारे, विशाल पालवे, आकाश जगताप, ऋषीकेश सब्बन, अक्षय आंधळे आदि उपस्थित होते.

     प्रास्तविकात प्राचार्या कांचन गावडे यांनी संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन आजच्या जागतिक महिला दिनाचे महत्व सांगितले.

     सूत्रसंचालन आशा वरखडे यांनी केले तर आभार पांडूरंग मिसाळ यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments