उदय शेळके जिल्हाबँकेचे अध्यक्ष ,तर उपाध्यक्ष माधवराव कानवडे

 उदय शेळके जिल्हाबँकेचे अध्यक्ष ,तर  उपाध्यक्ष माधवराव कानवडे 

 वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष ॲड . उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची निवड झाली.

पदाधिकारी निवडीसाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची शनिवारी दुपारी बैठक झाली. या बैठकीत शेळके आणि कानवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

निवडीनंतर शेळके आणि कानवडे यांचा सत्कार करण्यात आला. बँकेची उत्कृष्ट कारभाराची परंपरा पुढे चालविण्याचा विश्वास नूतन पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीने वर्चस्व राखलं असून अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला देण्यात आली आहे.त्यानुसार शनिवारी सकाळी वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होवून अध्यक्षपदासाठी शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Post a Comment

0 Comments