योगसाधना : लोलासन
पद्धती :
१) पाय सरळ पुढे पसरून जमिनीवर बसा.तळहात पार्श्वभागा शेजारी जमिनीवर टेकवा आणि पार्श्वभाग वर उचला.
२) पार्श्वभाग उचला उजवा गुडघा वाकूऊन मागे घ्या उजवा चावडा उजव्या पार्श्वभागा खाली ठेवा आणि त्यावर बसा. डावा गुडघा वाकून मागे घ्या आणि पार्श्वभाग उचलून डावा चवडा पार्श्वभागा खाली ठेवून त्यावर बसा.
३) उजवी नडगी -डाव्या पोटरी वर येईल अशा तऱ्हेने मांडी घातली जाईल पायाची बोटे मागे रोखलेली असू द्या.काहीवेळ श्वसन करा श्वास सोडा धड आणि पाय जमिनीवरून उचला हात ताठ करून हातावर तोल सांभाळा धड आणि पाय यांना संथपणे पुढे व मागे झोका द्या श्वसन नेहमीप्रमाणे चालू ठेवा.
४) जमिनीवर टेकून विसावा घ्या आणि मांडी सोडा.उलट्या बाजूने मांडी घाला आणि पुन्हा हातावर तोल सांभाळा.
५)शक्य होईल तितका वेळ हातावर शरीर तोलून धरा.
परिणाम : या आसनामुळे मनगटे आणि हात सशक्त बनतात. त्याचप्रमाणे पाठीचे स्नायू व पोटातील अवयव यांना शक्ती मिळते पायांचे स्नायू त्यामुळे लवचिक बनतात आणि हातामधील दुय्यम स्नायू विकसित होऊन सुधारतात.
0 Comments