अखेर रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा

 अखेर रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा 

 वेब टीम बेंगळुरू : कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोली यांना 'अश्लील सीडी उघड झाल्या प्रकरणी '  मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. जारकीहोली यांनी आज राजीनामा दिला.

त्यांनी दिलेला  मंत्रिपदाचा राजीनामा कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा  यांनी स्वीकारला आहे. हा  राजीनामा राज्यपालांच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पाठवला आहे. जारकीहोली हे कर्नाटकातील गोकाकचे भाजपचे आमदार आहेत. तसंच बेळगावचे ते पालकमंत्री होते.

जारकीहोली यांचा एक व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.पण हा व्हिडिओ 'बनावट' असल्याचं सांगत जारकीहोली यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता.मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूतकाढल्या नंतर त्याते राजीनामा देण्यास राजी झाले. . मात्र चौकशीत निर्दोष   आढळल्यानंतर पुन्हा मंत्रिपद बहाल केले जाईल, या अटीवर जारकीहोली यांनी राजीनामा दिला.

 चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात भाजप विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजप प्रचाराच्या मैदानात उतर असताना जारकीहोली यांची 'सेक्स सीडी' समोर आली आहे. तसंच कर्नाटकचा अर्थसंकल्प उद्या ४ मार्चला विधानसभेत मांडला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर भाजपला हा मोठा झटका बसला आहे.

Post a Comment

0 Comments