हिवरेबाजार लवकरच घेणार लॉकडाऊनचा निर्णय

 हिवरेबाजार लवकरच घेणार  लॉकडाऊनचा निर्णय 

वेब टीम नगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतांना दिसतोय .तेव्हा गरज पडली तर नजीकच्या काळात लॉकडाऊनचा निर्णय घेऊ.  अन्यथा एप्रिल महिन्याच्या  शेवटी किंवा मे महिन्यात लॉकडाऊनचा निर्णय घेणार असल्याची माहिती आदर्श गाव हिवरेबाजारचे उपसरपंच पोपटराव पवार यांनी दिली. 

सध्या कोरोनाचा प्रभाव वाढतांना दिसत असून आणखीन रुग्णसंख्या वाढली तर कोणत्याही प्रकारचे कठोर निर्णय घ्यावे लागतील. मात्र गेल्यावर्षी लॉक डाऊन लावल्यानंतर  त्याचे चांगले परिणाम दिसून आले जगभरातील प्रदूषण कमी झाले .ओझोन थराची स्थिती सुधारली त्याचे चांगले परिणाम दिसू लागल्याने आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी आता यापुढे दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत लॉकडाऊन करणार असल्याचे जाहीर केले होते . त्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील वक्तव्य केले. 

कोरोनाची पुन्हा आलेली लाट आता जोर धरत असून  रुग्नांची संख्या वाढतांना दिसतेय . याबाबत जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा आपल्या परीने कामाला लागली असून त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन सर्वानी केले पाहिजे,जेणेकरून लवकरच कोरोना आटोक्यात येईल असे ते म्हणाले.  

Post a Comment

0 Comments