नगर बुलेटीन ०३-०२-२०२१

नगर बुलेटीन ०३-०२-२०२१

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दुकानासमोरील अतिक्रमण हटवा अन्यथा आत्मदहन 

 भिंगारच्या व्यापार्यााचा इशारा : अतिक्रमण करणारी महिला पैश्यासाठी मानसिक त्रास देत असल्याचा आरोप

वेब टीम नगर : भिंगार येथील विशाखापट्टणम महामार्गावर विजय लाईन चौकात दुकानासमोरील अतिक्रमण न हटविता अॅगट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन पैश्यासाठी मानसिक त्रास देणार्याम महिलेवर कारवाई करुन सदरचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीचे निवेदन स्थानिक व्यापारी सुमित कुमार संतोष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. सदर महिले विरोधात कारवाई न झाल्यास दि.१५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सुमित कुमार संतोष प्रसाद यांचे भिंगार येथे विजय लाईन चौकात स्वत:च्या मालकीचे दुकान आहे. तेथे शीतपेय व खाद्य पदार्थ जिल्ह्यात पुरविण्याचे काम केले जाते. या दुकानासमोर एका महिलेने अतिक्रमण केले असून, सदर अतिक्रमण काढण्यासाठी सुमित कुमार यांनी तक्रार करुन दि.२७ ऑगस्ट २०२० रोजी प्रशासनाच्या मदतीने हटविले होते. परंतु सदर महिने पुन्हा दुकानासमोर दि.४ डिसेंबर २०२० रोजी अतिक्रमण केले व त्यानंतर मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे. सदर महिला अॅुट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असून, काही राजकीय पक्ष व संघटना सोबत घेऊन वारंवार पैशाची मागणी करत असल्याचा आरोप सुमित कुमार यांनी केला आहे.

कुटुंबातील कर्ता पुरुष असून, संपुर्ण कुटुंब एकट्यावर अलंबून असून, सदर महिलेपासून धोका निर्माण झाला आहे. सदर प्रकरणी महिले विरोधात भिंगार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करुन घेण्यात आलेला नसून, पोलीस प्रशासन सदर प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. दुकानासमोरील महिलेचे अनाधिकृत अतिक्रमण तातडीने हटवावे अन्यथा १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुमित कुमार यांनी दिला आहे. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर जिल्ह्यात खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र मिळावे

राष्ट्रवादी क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन

 अहमदनगर जिल्ह्याला डावलण्यात आल्याने नाराजीचा सूर

वेब टीम नगर : खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातून अहमदनगर जिल्ह्याला डावलण्यात आले असून, जिल्ह्यात खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र मिळण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी क्रीडा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष घनश्याम सानप, निखिल कुर्हाेडे, प्रसाद सामलेटी, पोपट लोंढे, अमोल काजळे आदी उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात खेळाडूंना प्रशिक्षण केंद्र जाहीर करण्यात आले असून, महाराष्ट्रात २३ जिल्ह्यांना विविध १५ खेळाचे प्रशिक्षण केंद्र म्हणून वर्तमानपत्राद्वारे घोषित करण्यात आले आहे. परंतु अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असून, जिल्ह्यात खेळाच्या सरावासाठी चांगले स्टेडियम, ज्युदो, तिरंदाजी, नेमबाजी, कबड्डी, खो-खो जलतरण आदी विविध खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच छत्रपती पुरस्कार प्राप्त अनेक राष्ट्रीय खेळाडू आहेत. तरीसुद्धा खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातून अहमदनगर जिल्ह्याचा समावेश झाला नसून, एकप्रकारे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रावर अन्याय झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक, क्रीडा प्रेमी संघटनांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लवकरात लवकर खेलो इंडियाचे प्रशिक्षण केंद्र घोषित करण्याची मागणी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते व मनपा विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आली. यावेळी क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी जिल्ह्यातील सात प्रस्ताव खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रासाठी पाठविण्यात आले असल्याचे सांगून, पुढील टप्प्यात अहमदनगर जिल्ह्याचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सावकाराचा जमीन लाटण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाणार 

अॅवड. कारभारी गवळी : भांडेवाडीला गुगल मॅपच्या सहाय्याने काळीआई ताबा पडताळणी

वेब टीम नगर :  पीपल्स हेल्पलाईन व सावकारी शोषणा विरोधी जन आंदोलनच्या वतीने सुपारी घेऊन शेतजमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणार्यां्विरोधात शनिवार दि.६ मार्च रोजी भांडेवाडी (ता. कर्जत) येथे गुगल मॅपच्या सहाय्याने काळीआई ताबा पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती अॅरड. कारभारी गवळी यांनी दिली.

भांडेवाडी (ता. कर्जत) येथे गट नं. १८४, १८५, १८६ व १८७ मध्ये संपत लक्ष्मण पवार, पार्वती रामचंद्र शिंदे, सरस्वती दत्तू क्षीरसागर, दिगंबर बाळू पवार, दिनानाथ बाळू पवार यांच्या वडिलोपार्जीत जमीन आहे. गट नं. १८४ मधील १ हेक्टर १० आर जमीन असून, यापैकी ९० आर जमीन कॅनॉलमध्ये गेली. तर गट नं. १८५ मधील २ हेक्टर २ आर जमीन सावकार लाटण्याच्या तयारीत आहे. कॅनॉलमुळे सर्व जमीनी दक्षिणेच्या बाजूला आहेत. यामध्ये थोडी जमीन उत्तरेत गेल्याने ती जमीन बापू दळवीला विकण्यात आली. यामध्ये शेततळे देखील आहे. इतर सर्व जमीनीवर पवार कुटुंबीयांचा ताबा आहे. सावकार कधीही या जमीनीत आला नाही व त्याने जमीन कसलेली नसल्याचे पवार कुटुंबीयांनी सांगितले आहे. अॅाड. गवळी यांनी गुगल मॅपमुळे सुर्यनामा करणे सोपे होणार असून, याद्वारे जमीन कोणाच्या ताब्यात सिध्द होणार आहे. सावकाराने खोट्या कागदपत्राद्वारे जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र बहिणींचा हिस्सा विचारात न घेतल्याने हे प्रकरण सावकाराच्या अंगलट आले असून, सदर जमीन लाटण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाणार असल्याचे म्हंटले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वाळकीच्या पुरातन महादेव मंदिराच्या सभामंडपाची रंगरंगोटी 

वेब टीम नगर :  वाळकी (ता. नगर) येथील पुरातण काळातील स्वयंभू गौरी-शंकर महादेव मंदिराच्या सभामंडपास सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी आकर्षक रंगरंगोटी करुन सजावट केली. महाशिवरात्रीच्या पार्श्व-भूमीवर भालसिंग यांनी या सभामंडपाची रंगरंगोटी केली असून, गावातील सभामंडप सर्वांचे लक्ष वेधत आहे.

विजय भालसिंग गावातील धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत असतात. त्यांनी यापुर्वी देखील स्वयंभू गौरी-शंकर महादेव मंदिरास आकर्षक नंदीची मुर्ती भेट दिली होती. तर या मंदिराजवळ असलेल्या ऐतिहासिक बारवचे संपुर्ण गाळ काढून स्वच्छता केली होती. यामुळे बारवला सध्यस्थितीमध्ये चांगले पाणी उपलब्ध आहे. तसेच भालसिंग विविध सामाजिक कार्यात आपले योगदान देत असून, त्यांनी केलेल्या सभामंडपाच्या रंगरंगोटी व सजावटीच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पतसंस्थांच्या ठेवींना १ टक्का अधिक व्याज मिळण्यासाठी पाठपुरावा करू : संचालक प्रशांत गायकवाड

वेब टीम नगर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळे विजय मिळाला आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्याचे ऋण कामांच्या माध्यमातून फेडणार आहे. जिल्हा बँकेत पतसंस्थांचा प्रतिनिधी म्हणून काम करत पतसंस्थांच्या प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणार आहे. बँकेत मोठ्या प्रमाणात असलेल्या पतसंस्थांच्या ठेवींना १ टक्का अधिक व्याजदर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करू. पतसंस्थांना आधार व पाठबळ देणाऱ्या स्थैर्यनिधी सारख्या संस्थेने केलेला सत्कार प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रशांत गायकवाड यांनी केले.

          नगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या वतीने जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रशांत गायकवाड यांचा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, उपाध्यक्ष वसंत लोढा, संचालक शिवाजी कपाळे, सुशीला नवले, सहकार भरतीचे अध्यक्ष रवी बोरावके, आर.डी.मंत्री, उमेश मोरगावकर, विठ्ठल आभंग, बापूसाहेब उंडे, व्यवस्थापक महेश जाधाव आदी उपस्थित होते.

          यावेळी काका कोयटे म्हणाले, जिल्हा बँकेत पतसंस्थांचा प्रतिनिधी असावा अशी भूमिका मी निवडणुकीच्या सुरवातीला घेतली होती. प्रशांत गायकवाड यांच्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण झाली आहे. पतसंस्था चळवळीतील कार्यकर्त्याचा बँकेत प्रवेश झाला असल्याने प्रशांत गायकवाड पतसंस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देतीलच.

          सुरेश वाबळे म्हणाले, प्रशांत गायकवाड यांच्या रूपाने चांगले काम करणाऱ्या युवक जिल्हा बँकेला मिळाला आहे. पारनेर बाजार समितीचे सभापती म्हणून केलेल्या उत्कृष्ठ कामाची ही पावती आहे.

          वसंत लोढा म्हणाले, जिल्ह्यातील पतसंस्थांच्या २५ टक्के ठेवी जिल्हा बँकेत आहेत. पतसंस्थांच्या ठेवींना १टक्का अधिक व्याजदर मिळावा ही अनेक वर्षापासुंची आमची मागणी आहे. या मागणीची पूर्तता पूर्ण होण्यासाठी प्रशांत गायकवाड यांनी पाठपुरावा करावा.

यावेळी उपनिबंधक दिग्विजय आहेर, रवी बोरावके यांचेही शुभेच्छापर भाषणे झाली. शिवाजी कपाळे यांनी प्रास्ताविक केले, महेश जाधव यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानवरुपी भक्तांची सेवा परमेश्व-राला सर्वश्रेष्ठ

 हभप माळवदे महाराज : संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथीची  विठ्ठल मंदिरात सप्ताह सांगता

   वेब टीम नगर : मानवी जीवनाची नौका पैलतीराला लावण्यासाठी संतांनी केलेले कार्य हे अमुल्य आहे. माणसाचे जीवन खर्याब अर्थाने सार्थकी लागण्यासाठी आपल्या आयुष्यात अनेक हाल, अपेष्टा व अवमान पचविले आहेत. संत नरहरी महाराजांनी आपले सगळे आयुष्य भक्तांच्या उद्धासाठी वेचले. त्यांच्या सेवेसाठी साक्षात पांडूरंगांनी मदत केल्याचे अनेक दाखले असल्याचे सांगत हभप जनार्दन महाराज माळवदे यांनी सांगतांना मानवरुपी भक्तांची सेवा परमेश्वेरालाही सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले.

     संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त नगर शहरातील लाड सुवर्णकार समाज, युवक संघटनेच्यावतीने कोर्ट गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात आयोजित हरिनाम सप्ताह समाप्तीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष संजय देवळालीकर, हभप किशोर महाराज माळवदे, संचालक मुकुंद निफाडकर, प्रकाश देवळालीकर, सुरेश मैड, किशोर शहरकर, अनिल कुलथे उपस्थित होते.

     यावेळी हभप जनार्दन महाराज व सात दिवस हरिकिर्तन करणारे हभप किशोर महाराज माळवदे यांचा अध्यक्ष संजय देवळालीकर यांनी सन्मान केला.

     कोविड प्रादुर्भावामुळे यावर्षी मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत हा सप्ताह साजरा झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिओम व स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, लाड सुवर्णकार संचालक मंडळ तसेच युवक संघटना कार्यकर्ते, शहरकर परिवार यांचे अमुल्य सहकार्य लाभले. आभार मुकुंद निफाडकर यांनी मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

व्हर्च्युअल रुपातील  निरंकारी संत सत्संग  जीवनाला नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देऊन गेला

    वेब टीम नगर : महाराष्ट्राचा ५४ वा तीन दिवसीय वार्षिक निरंकारी संत सत्संग  जीवनाला एक नवी दिशा, ऊर्जा आणि सकारात्मकता देऊन गेला.व्हर्च्युअल रुपात आयोजित करण्यात आलेल्या या समागमाचे थेट प्रसारण निरंकारी मिशनची वेबसाईट तसेच संस्कार टी.व्ही. चॅनलच्या माध्यमातून करण्यात आले. संपूर्ण भारतासह विदेशातील लाखो निरंकारी भक्तांनी तसेच अन्य भाविक सज्जनांनी घरबसल्या या संत सत्संगाचा  भरपूर आनंद प्राप्त केला.

     संत सत्संगाच्या  समारोपप्रसंगी निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या की, आपण स्वत:ला वास्तविक मनुष्य म्हणवून घेत असू तर आपल्यामध्ये मानवी गुण असण्याची नितांत गरज आहे. या विपरित कोणतीही भावना मनामध्ये येत असेल तर स्वत:चे मुल्यांकन करावे लागेल. सुक्ष्म नजरेने मनाच्या तराजूत तोलून पहावे लागेल, असे केले तर आपण कुठे चुकत आहोत हे आपल्याला उमगू शकेल, असे सांगितले.

     सद्गुरु माता सुदीक्षाजी पुढे म्हणाल्या, वास्तविक मनुष्य होण्यासाठी सकळजनांवर प्रेम करणे, सर्वांच्या प्रति सहानुभती बाळगणे, उदारमतवादी होऊन इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करुन त्यांच्यातील सद्गुण ग्रहण करणे, सर्वांना समदृष्टीने पाहणे आणि आत्मवत भावनेने इतरांचे दु:ख देखील स्वत:च्या दु:खासमान मानणे यासह इतरही अनेक मानवी गुणांनी युक्त होण्यासाठी आवश्यकता आहे, अशी प्रेरणा दिली.

सत्संगाच्या दुसर्या  दिवशी सेवादल रॅली झाली. रॅलीमध्ये शारीरिक कवायती व्यतिरिक्त विविध खेळ आणि मल्लखांब, मानवी मनोरे यासारख्या साहसी करामती दाखविण्यात आल्या. शिवाय मिशनच्या शिकवणुकीवर आधारित लघुनाटिकाही प्रस्तुत करण्यात आल्या. याशिवाय ‘स्थितरतेशी नाते मनाचे जोडून, जीवन आपले सहज करु या’ या विषयावर आधारित बहुभाषी कवी संमेलन पार पडले. या कवी संमेलनामध्ये जीवनातील अस्थितरतेची कारणे, स्थितरतेची गरज आणि स्थिरतेचे उपाय यावर प्रभावशाली रितीने कवी सज्जनांनी प्रबोधन केले.

     सत्संगाच्या तिन्ही दिवशी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील तसेच जवळपासच्या राज्यांसह देशाच्या काही प्रांतातील व विदेशातील अनेक व्यक्त्यांनी विविध भाषांतून आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले. याशिवाय संपूर्ण अवतार वाणी आणि संपूर्ण हरदेव बाणीतील पावन पदांचे किर्तन, पुरातन संतांची अभंगवाणी तसेच मिशनच्या गीतकारांनी तयार केलेल्या प्रेरणादायी भक्तीरचना प्रस्तुत करुन मिशनच्या विचारधारेवर आधारित संदेश प्रसारित करण्यात आला.-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 उड्डाणपुलाच्या कामाला खोडा घालू नये

अन्वर खान : उड्डाणपुलाच्या नामांतराची स्पर्धा सुरु करुन अनेक विघ्न पार करत सुरु झालेल्या पुलाचे काम थांबू  नये 

    वेब टीम नगर : शहराच्या वाहतुकीच्या समस्येला अत्यावश्यक असलेल्या शहरातील एकमेव उड्डाणपुलाचे काम सुरु झालेले आहे. उड्डाण पुलास नाव देण्यावरुन अनेक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पुढारी यांच्यात पुलाचे नामांतरावरुन स्पर्धा सुरु झाली असून,  तरी नामांतराचे राकारण थांबवावे व उड्डाण पुलास खोडा घालू नये, असे आवाहन भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान यांनी केले आहे.

     तात्कालीन खा.दिलीप गांधी यांच्या विशेष पाठपुराव्याने केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिलेल्या उड्डाण पुलाला गेल्या 8-10 वर्षांत अनेक विघ्न-अडथळे पार करत कशीबशी सुरुवात झालेली असतांना या नामांतराच्या चढाओढीपेक्षा उड्डाण पुलाचे कामात येणारे अडथळे दूर करण्यास सहकार्य करुन पुलाचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. उड्डाणपुल पूर्ण झाल्याने अवजड वाहतुक व नगर-पुणे-औरंगाबाद-मनमाड हायवेची वाहतुक या पुलावरुन सुरु होऊन होणारे मोठे अपघात टळतील. या अगोदर वाहतुकीच्या समस्येमुळे हजारो सर्वसामान्य जनतेचे बळी गेलेले आहेत. त्या कारणाने या उड्डाणपुलाची शहराला अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामास सहकार्य करुन तो पूर्ण होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यशस्वी होण्यासाठी परिस्थिती अडथळा ठरु शकत नाही

प्रा.मकरंद खेर : सीताराम सारडा विद्यालयात विज्ञान दिन साजरा

    वेब टीम नगर : यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. यात आपली आर्थिक परिस्थिती अडथळा ठरु शकत नाही. विज्ञानवाद माणसाला हुशार बनवित असून, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्राचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. वैज्ञानिक व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेतली पाहिजे. कारण अनेक वैज्ञानिकांनी प्रतिकुल परिस्थितीत शोध लावले आहेत. या शोधांचा जगच्या कल्याणासाठी मोठा उपयोग झाला आहे. भारताने वैज्ञानिक क्षेत्रात जगात मोठे यश मिळविले आहे. यामध्ये अनेक शास्त्रज्ञांचा वाटा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगळे कलागुण असतात त्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.मकरंद खेर यांनी केले.

     हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात विज्ञान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन प्रा.मकरंद खेर बोलत होते. प्रारंभी डॉ.सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन अनोख्या पद्धतीने टाळी वाजवून बल्ब प्रकाशित करुन करण्यात आले. याप्रसंगी शुभदा खेर, आदित्य देवचक्के, मुख्याध्यापक संजय मुदगल, पर्यवेक्षिका अलका भालेकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी आदित्य देवचक्के म्हणाले, गरजेतून विविध शोध लागतात, यासाठी विद्यार्थ्यांनी चिकित्सकदृष्टी ठेवून अभ्यास केला पाहिजे.  ध्येय निश्चि,त केल्याय यश निश्चितत मिळत असते. आपल्यातील चांगल्या क्षमतांचा उपयोग केल्यास यश मिळत असते. असे सांगून आपल्या अमेरिका प्रवासाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.

     मुख्याध्यापक संजय मुदगल व पर्यवेक्षिका अलका भालेकर यांनी विज्ञान दिनाबाबतची माहिती दिली.  यावेळी विनोद देसाई, सुजाता खामकर यांनी मनोगत व्यक्त केले.

     प्रास्तविक वृषाली जोशी यांनी केले तर दिपाली लगड यांनी मान्यवरांचा परिचय करुन दिला.  क्रांती मुंदानकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. शारदा महांडुळे यांना च्यवनप्राश निर्मितीसाठी ग्लोबल  राष्ट्रीय पुरस्कार 

वेब टीम नगर :  केडगाव येथील डॉ. शारदा प्रशांत महांडुळे यांना विविध वयोगटानुसार तयार केलेल्या च्यवनप्राशच्या निर्मितीसाठी ग्लोबल नॅशनल रेकॉर्डस् अँड रिसर्च फाउंडेशनचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते डॉ. महांडुळे यांनी स्वीकारला.

डॉ. शारदा महांडुळे यांनी विविध वयोगटानुसार त्यांनी बालप्राश, सखीप्राश, गर्भिणीप्राश, अमृतप्राश, सूर्यप्राश असे च्यवनप्राशचे प्रकार बनवले आहेत. आयुर्वेद क्षेत्रातील डॉ. महांडुळे यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.

प्रणव हॉस्पिटल, मीरा मेडिकल फाउंडेशन व दुर्वांकूर पंचकर्म आणि वंध्यत्व निवारण केंद्राच्या माध्यमातून त्या रुग्ण सेवा करीत आहेत.अमृतवेल आयुर्वेदिक उद्यानाच्या  माध्यमातून डॉ. महांडुळे आयुर्वेदिक शेती संकल्पना राबवत आहेत. गर्भवती स्त्रियांसाठीच असलेल्या जगातील पहिल्या चवनप्राशची संशोधन निर्मिती डॉ. महांडुळे यांनी केली आहे. सूर्य प्राश आणि सखी प्राश  या त्यांच्या संशोधनातून अनेक वंध्यत्व असणाऱ्या दाम्पत्यांना संतती झालेली आहे.  वंध्यत्व समस्या, वारंवार गर्भपात, त्रासदायक गर्भारपण जन्मजात बाळामध्ये वैगुण्य असा इतिहास असणाऱ्या दाम्पत्यामध्ये हे संशोधन वरदान ठरत आहे. अनेक दाम्पत्य टेस्ट ट्युब उपचार करुनही अपत्य प्राप्ती न झाल्याने निराश होतात त्यांच्या साठी हे संशोधन वरदान ठरत आहे.  गर्भसंस्काराच्या सीडी प्रकाशन व पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. आरोग्य विषयक एकुण त्यांनी ५ पुस्तकांचे लेखन केलेले आहे. हा पुरस्कार  मिळाल्याबद्दल त्यांचे नगर शहर व जिल्ह्यातील वैद्यकीय, शैक्षणिक, तसेच सामाजिक क्षेत्रामधून अभिनंदन होत आहे. Post a Comment

0 Comments