योगसाधना : अर्ध नौकासन / नौकासन

 योगसाधना 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अर्ध नौकासन / नौकासन

 नौकासन  म्हणजे होडी  जहाज किंवा गलबत हे असं होडी  सारखे दिसते म्हणून त्याला हे नाव दिले आहे . 

पद्धती : 

१) जमिनीवर बसा पाय सरळ समोर पसरा आणि ते ताठ ठेवा. बोटं एकमेकांमध्ये गुंफा आणि ती मानेच्या वर डोक्याच्या पाठीमागे ठेवा.  

२)श्वास सोडा मग धड मागच्या बाजूला ठेवा आणि त्याच वेळी पाय जमिनीपासून वर उचला गुडघे गट्ट आवळलेले आणि पायाची बोटे रोखलेली असुद्यात आता शरीराचा तोल कमरेवर तोलला जाईल पाठीच्या कण्याचा कोणताही भाग जमिनीला टेकू नये अशी दक्षता ठेवा. आता पोटाचे स्नायू आणि पाठीचा खालचा भाग यांच्यावर पकड आल्याचे जाणवेल.  

३) पाय जमिनीवरून तीस ते पस्तीस अंशाचा कोन करून ठेवा डोक्याची काळू पायाच्या बोटाच्या पातळीत असू द्या. या स्थितीत दीर्घ श्वसन करत  30 सेकंद राहा या आसनात एक मिनिट राहता आले तर त्यावरून पोटाचे स्नायू शक्तिमान असल्याचे सूचित होते.  

४) हे आसन करताना श्वास कोंडून धरू नका त्या असं आत श्वास आत घेतल्यावर श्वसन थांबण्याची प्रवृत्ती नेहमीच होते हे खरे पण श्वास कोंडून धरला तर पोटाच्या स्नायूंवर त्याचा परिणाम जाणवू लागेल पोटातील अवयवांवर नाही.यामुळे पोटाच्या स्नायू वरील पकड होईल ही पकड टिकावी यासाठी श्वास घ्या श्वास सोडा श्वसन जरा थांबवा आणि दीर्घ श्वसन न करता हीच क्रिया चालू ठेवा.  त्यामुळे केवळ पोटाच्या स्नायूंची नव्हे तर पोटातील इंद्रियांचा ही व्यायाम घडेल . 

५)अर्ध नावासन आणि परिपूर्ण नावासन  याच्या मधील भेद नीट लक्षात घ्या परिपूर्ण नावासनामध्ये पाय अधिक उंचावर नेले जातात व पोट यामधील अंतर अर्धनांवासनातल्या  पेक्षा कमी असते . 

परिणाम :  पायाच्या विशिष्ट स्थितीमुळे अर्ध नावासन आणि परिपूर्ण नावासन या दोहोंचा परिणामांमध्ये फरक पडतो परिपूर्ण नावासनाचा परिणाम आतड्यांवर होतो उलट अर्धनावासनाचा परिणाम यकृत पित्ताशय आणि प्लिहा  यांच्यावर होतो सुरुवातीला या आसनाचा ताण सहन करण्याची इतकी शक्ती पाठीमध्ये नसते या आसनात टिकून राहण्याची क्षमता येऊ लागली म्हणजे पाठ व कंबर सशक्त बनवत आहे असे समजावे . अशक्त पाठ ही अनेक दृष्टीने उणीव असते. ही दोन आसने  आणि त्यांच्यामधील पाठीच्या कण्याला पीळ  देणे यामुळे पाठीमध्ये मजबूतपणा येतो.  वृद्ध माणसे कशी बसतात कशी उठतात आणि कशी चालतात हे आपण नीट पाहिले तर पाठीचा खालचा भाग निकोप असण्याचे महत्त्व आपल्याला कळून येईल.  अशी माणसे अजाणता किंवा जाणीवपूर्वक आपल्या पाठी हाताचा आधार देतात यावरून ध्यानात येते की त्यांची पाठ दुर्बल असून त्यांना ताण सहन होत नाही.  जोपर्यंत पाठ सशक्त आहे आणि तिला आधाराची गरज पडत नाही तोपर्यंत वय खूप वाढले तरी माणसाला तरुण असल्यासारखे वाटते . वरील दोन आसनांमुळे पाठी मध्ये चैतन्य आणि जोम मिळतो आणि वृद्धपणातही हालचाली तरतरीत व डौलदार राहतात.  



Post a Comment

0 Comments