अट्टल गुन्हेगार व चोरीचे सोने विकत घेणारा असे दोघे जेरबंद

अट्टल गुन्हेगार व चोरीचे सोने विकत घेणारा असे दोघे  जेरबंद 

 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.:  ९४,३२,०००रु. किंमतीचे  सोन्याचे दागिने , वाहने व मोबाईल हस्तगत 

वेब टीम नगर : दि.  २७/०१/२०२१ रोजी फिर्यादी रिमा वालचंद घाडगे, वय- ४० वर्षे, थंदा- नोकरी, रॉ. बडगांब तांदळी, ता- नगर हे सायंकाळचे वेळोवेळी  घर बंद करुन व  घरास कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले असताना कोणोतरी  अज्ञात गुन्हेगाराने त्याचे  घराचे दरबाजाचे कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश करुन.घरातील सोने-चांदीचे दागिणे असा एकृण७२हजार रुपयांची  घरफोडी चोरी करुन चोरून नेलेला होता. सदर घटनेवरून फिर्याद  नगर तालुका पोलीस स्टेशन ला दाखल केली 

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर व अशाप्रकारच गुन्हे वारंवार होत असल्यामूळे पोलीस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीसअधीक्षक  सौरभ कूमार अग्रवाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व  अंमलदार यांचे पथक नेमून सदर गुन्ह्याचा तपास करून  गुन्हा उघडकीस आणण्या बाबत  अनिल कटके कटके, पोलोस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे कटके यांनी  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारो यांचे स्वतंत्र पथक  नेमून तपासाबाबत सुचना दिल्या. 

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा  समांतर तपास करीत असताना पोनि अनिल कटक यांना गुप्त खबऱ्याकडूनमाहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा भगवान ईश्वर  भोसले, रा.बेळगाव ता.  कर्जत याने वत्याचे साथीदारांनी मिळून केला असून  भगवान ईश्वर भोसले व त्याचा भाऊ संदोप ईश्वर अस दोघे दोन मोटार सायकलवरून  चोरीचे सोने विक्री करण्यासाठीशिरुर कासार, जि- बोड येथोल सोनाराकडे येणार अशो खात्रीशीर  माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील  पोसई/गणेश इंगळे. पोना/सुनिल चव्हाण, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, यवन मखरे, पोना/ आण्णा पवार, संदोप दंरदले, शंकर चौधरी , दिपक शिदे, जालिंदर माने. चालक पोहेकॉ/डमाकांत गावडे अशांनो मिळून शिरुर  कासार, जि- बीड येथे जावून मिळालेल्या बातमी नुसार कडा ते शिरुर कासार रस्त्यावर सापळा रचला  त्यानंतर काही  वेळातच भगवान भोसले व  त्याचा भाऊ  संदिप भोसले असे दोघे दोन मोटार सायकलवरून येतांना  दिसल्याने पथकातील  अधिकारी  व अंमलदार यांनी  त्यांना ताब्यात घेण्यासाठी घेराव घातला असता.  संदीप भोसले त्याच्या  ताब्यातील मोटार सायकल जागीच सोडून पळून गेला. त्याचा पथकातील अधिकारी व  अंमलदार यांनी  पाठलाग केला पण तो मिळून आला नाही . आरोपी  नामे १) भगवान ईश्वर भोसले,बेलगांव, ता- कर्जत यांस शिताफीने  ताब्यात घेतले, त्यास विश्वासात घेवून सदर गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुसा केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. 

त्यानंतर  पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतल्यावर  ४,५६,०००/-र. किं. चे अंदाजे ९तोळे सोन्याचे दागिने  मणिमंगळसुत्र ' राणीहार,  चेन, नेकलेल व कर्णकुले तसेच १लाख २५ रुपयाची होंडाबाईक ,१लाख रुपयांची होंडा शाईन मोटारसायकल ,वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण ७लाख ३११हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

ईश्वर भोसले याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने १५ दिवसांपूर्वी संदीप भोसले , मिलन भोसले , आतल्या भोसले व मटक भोसले सर्व रा. बेळगाव ता. कर्जत यांनी हिंगणगाव येथील एका बंद बंगल्याचा दरवाजा दिवस तोडून दागिने चोरून आणल्याचे सांगितले या पूर्वी ओयहे कोठे चोऱ्या केल्या या बाबत चौकशी केली असता त्यांनी नगर तालुका , एम आय . डी  सी, पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोऱ्या केल्याची कबुली दिली. चोरलेले दागिने शिरूर कासार जिल्हा बीड येथील गणेश ज्वेलर्स या दुकानात विकल्याचे सांगितले दुकानाचा मालक रामा अभिमन्यू इंगळे वय ३३ रा. पाडळी ता. शिरूर कासार जिल्हा बीड याचे कडे चौकशी केली असता त्यांना सोने विकत घेतल्याची कबुली दिली त्याच्या कडून ७ लाख ६० हजार किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने त्यात अंगठी , चैन , कानातील रिंगा  , गंठण , कानातील झुबे , नेकलेस , नथ , गळ्यातील पदक , असे दागिने जप्त करण्यात आले. इक्ष्वार भोसले व त्याच्या साथीदारांवर नगर तालुका पोलीस टेंशन मध्ये ३ एम आय डी सी पोलीस स्टेशनला एक पारनेर पोलीस स्टेशनला २ गुन्हे दाखल असून भगवान ईश्वर भोसले ह्ग सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कर्जत मध्ये २ , आष्टी , सांगोला आणि श्रीगोंदे येथे प्रत्येकी १ गुन्हा दाखल आहे. अश्या प्रकारे आरोपींकडून ५ घरफोड्या , १ जबरी चोरी असे ६ गुन्हे उघडकीस येऊन त्यांच्या कडून २५ ठोले सोन्यासह २ वाहने , २ मोबाईल असा १४ लाख ३२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.       


Post a Comment

0 Comments