योगसाधना : अधोमुखी श्वानासन

 योगसाधना 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अधोमुखी श्वानासन  

अधोमुखी  म्हणजे खाली तोड वळवणे,श्वान  म्हणजे कुत्रा डोके आणि पुढले पाय खाली व मागचे पाय वर अशा स्थितीतील कुत्र्यासारखे दिसते  सारखे दिसते म्हणून त्याला हे नाव पडले आहे. 

 पद्धती :

१) तोंड जमिनीकडे, पाय लांब करून जमिनीवर पालथे नीजा.  पावलामध्ये एक फूट अंतर असू द्या.तळहात छातीच्या बाजूला टेकवा बोटे सरळ व डोक्याकडे रोखलेली असू द्या.  

२) श्वास सोडा आणि जमिनीवरून उचला हात ताठ करा डोके आतल्या बाजूस पावलांच्या दिशेने वाकवा आणि टाळू जमिनीवर टेकवा.  कोपरे सरळ  राहु द्या . पाठ ताणून धरा.  

३)पाय ताठ ठेवा ते गुडघ्याशी  न वाकवता टाचा खाली ओढा. पायाचे चवडे आणि टाचा जमिनीवर पूर्णपणे टेकलेले असू द्या .पावले एकमेकाशी समांतर असू द्या, आणि पायाची बोटे सरळ पुढे रोखलेली राहू द्या . 

४)या आसनात दीर्घ श्वसन करत एक मिनिट रहा . मग श्वास सोडून डोके जमिनीवरून उचला धड पुढच्या दिशेला ताणा  सावकाशपणे शरीर व जमिनीवर टेकवा आणि विसावा घ्या. 

परिणाम : आपल्याला थकवा आला असेल तर या आसनामध्ये अधिक वेळ राहिल्यास थकवा निघून जातो व गेलेला जोम परत येतो.  दीर्घ अंतराच्या कठीण शर्यतीत धावल्यानंतर थकून जाणाऱ्या स्पर्धकांसाठी हे आसन विशेष  उपयुक्त आहे. त्यामुळे शर्यत स्पर्धकांचा वेग  सुधारतो आणि पायांचा मंदपणा नाहीसा होतो.  टाचांमधील वेदना आणि ताठरपणा या आसनामुळे नाहीसे होतात.  वाढणाऱ्या व कठीण बनणाऱ्या हाडांना मृदुता येते . घोटे सशक्त बनतात.  पायांना रेखीवपणा येतो खांद्याच्या त्यांचा जवळचा ताठरपणा कमी होऊन खांद्यांच्या सांध्यातील संधिवात बरा होतो.  पोटाचे स्नायू कण्याकडे खेचले जातात आणि सदृढ बनतात.  पोट व छाती यामधील पडदा छातीच्या पोकळीकडे  उचलला जात असल्यामुळे हृदयाच्या ठोक्यांचा वेग कमी होतो . हे अतिशय सुखकारक आसन आहे . ज्यांना शीर्षासन  करण्याची भीती वाटते त्यांना या आसनाचा अभ्यास करणे सोयीचे जाईल.  या आसनामध्ये धड खालच्या दिशेला नेले जाते.  त्यामुळे त्याला पूर्ण ताण दिला जातो आणि या विभागात हृदयावर विशेष ताण ना पडता निकोप रक्तप्रवाह वाहू लागतो मेंदूमधील पेशींना त्यामुळे नवचैतन्य लाभते आणि थकवा नाहीसा होतो.  मेंदू पुन्हा जोमदार बनतो.  तीव्र दाबाचा विकार असलेल्यांना हे आसन  करण्यास हरकत नाही. 

Post a Comment

0 Comments